The second wave is worse than the first: when the little ones are vaccinated; If you want to keep children away from the corona ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात भयानक स्वरुप धारण केले आहे. यात लहान मुलांनाही करोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा ही संख्या जास्त मोठी आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची सूट देण्यात आली असली, तरी अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अनिश्चितता आहे. आत्तापर्यंत लहानग्यांच्या लीसबाबत चाचण्याच करण्यात आलेल्या नाहीत. अशा स्थितीत लहानग्यांना सुरक्षित करायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना कोरोनापासून संरक्षणासाठीचे नियम शिकवण्याची गरज आहे.

  मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात भयानक स्वरुप धारण केले आहे. यात लहान मुलांनाही करोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा ही संख्या जास्त मोठी आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची सूट देण्यात आली असली, तरी अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अनिश्चितता आहे. आत्तापर्यंत लहानग्यांच्या लीसबाबत चाचण्याच करण्यात आलेल्या नाहीत. अशा स्थितीत लहानग्यांना सुरक्षित करायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना कोरोनापासून संरक्षणासाठीचे नियम शिकवण्याची गरज आहे.

  अमेरिकेत १६ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण, लहानग्यांचे कधी ?

  सध्या भारतात ज्या लसी देण्यात येत आहेत, त्या लसींची ट्रायल लहान मुलांवर घेण्यात आलेली नाही. मुलांना गुणकारी ठरु शकतील आणि त्या लसींच्या उपयुकत्तेबाबत, काही लसींच्या चाचण्या जगात सुरु आहेत. मात्र जोपर्यंत या लसींच्या चाचण्या पूर्म होत नाहबीत, तोपर्यंत मुलांसाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. या चाचण्या यशस्वी होत नाहबीत, तोपर्यंत सगळ्यांनाचच वाट पाहावी लागणार आहे. कोरोनाचे संक्रमण हे सर्वच वयोगटात होत आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. त्यातही ५० वर्षांवरील रुग्णांना, या रोगाचा जास्त धोका आहे. तर लहान मुलांमध्ये आत्तापर्यंत याचा सौम्य स्वरुपाचा संसर्ग दिसून आला आहे.

  लहान मुलांची काळजी घ्या

  लहानग्यांच्या पालकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे, असे आवाहन जागतिक रोग्य संघटनेनेही केले आहे. मुलांनाही या नियमांची सवय लावण्याची गरज आहे. हे नियम त्यांच्या सवयीचा भाग होण्याची गरज आहे. पालकांनी याबाबत मुलांशी संवाद साधण्याची आणि त्यांची भीती कमी करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. घरात वावरताना लसीकरण आणि बाहेर वावरताना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचीही गरज आहे.

  लहानग्यांची प्रतिकारशक्ती चांगली

  ज्यांची जीवनशैली ही आरोग्यदायी आहे, त्यांच्यावर कोरोनाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. लहान मुलांच्या शारिरिक हालचाली आणि व्यायाम यामुळे त्यांची प्रतिकारकशक्तीही चांगलीच मानण्यात येते. त्यामुळे त्यांना कोरोना झाला तरी त्याचे स्वरुप सौम्य स्वरुपाते राहते, असे असले तरी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा नवा व्हेरिंएट हा तरुणांना जास्त संक्रमित करतो, याचे कोणतेही पुरावे नाहीत. मात्र याचा संसर्ग सगळ्यांना होतो आहे. पहिल्या लाटेत नागरिकांनी जास्त खबरदारी घेतली होती, त्यामुळे लहानग्यांपर्यंत कोरोना पोहचला नव्हता. मात्र पहिली लाट ओसरल्यानंतर झालेल्या दुर्लक्षामुळे, आणि बेफिकिरीमुळे मुलांच्या संसर्गात वाढ होताना दिसते आहे.