The second wave of corona Health system equipped; Approval for purchase of drugs worth Rs 107 crore

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय  वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि  संस्थांना लागणारी औषधे, सर्जिकल साहित्य, रसायन, उपकरणांची हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाकडून खरेदी करणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. त्यानुसार हाफकीन महामंडळाकडून ही औषध खरेदी केली जात आहे.

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता ( Chance of a second wave of corona ) आणि सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने (Department of Medical Education) हाफकीन महामंडळाकडून (Halfkin Corporation) १०७ कोटी ४७ लाख रुपयांच्या औषध खरेदीला मान्यता दिली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय  वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि  संस्थांना लागणारी औषधे, सर्जिकल साहित्य, रसायन, उपकरणांची हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाकडून खरेदी करणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. त्यानुसार हाफकीन महामंडळाकडून ही औषध खरेदी केली जात आहे.

सप्टेंबरमध्ये झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात कोरोना उपाययोजनांसाठी ३०० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार कोविड रुग्णालयांसाठी १०७ कोटी ४७ लाख ४४ हजार ९३८ रुपयांची औषध खरेदी करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील औषधे, इंजेक्शने, सर्जिकल साहित्य विनावापर पडून राहणार नाही आणि त्यांचा योग्य मुदतीत वापर होईल याची दक्षता घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत  मंजूर केलेल्या निधीच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात येऊ नये, अशी सूचनाही सरकारने केली आहे.

औषधांसह  फेस मास्क, फेस शिल्ड, ग्लोव्हज, सर्जन कॅप, शू कव्हर यांची खरेदी होणार आहे.  २६ लाख २८ हजार थ्री लेअर फेस मास्क तसेच ९ लाख ७३ हजार ४०० फेस शिल्ड यांचा यात समावेश आहे.