iqbal chahal

मागील महिन्यांत दिवसाला सात हजार कोरोना चाचण्या केल्यानंतर ११०० कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. परंतु १ सप्टेंबरपासून दिवसाला पंधरा हजार चाचण्या केल्यावर दिवसाला २ हजार कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच ही कोरोनाची दुसरी लाट नसून कोरोना चाचणी वाढवल्यामुळे बाधितांची संख्या जास्त दिसत आहे.

मुंबई : मुंबईत (Mumbai) गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) आली आहे का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. परंतु यावर मुंबई महानगरपालिका आयुक्त (commissioner ) इक्बाल चहल यांनी सांगितले आहे की, कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही आहे. कोरोना चाचणीची संख्या वाढवल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मुंबईकरांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर आपण कोरोनाला फेब्रुवारी २०२१ पर्यंत हद्दपार करु शकतो. असे मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणाले.


मागील महिन्यांत दिवसाला सात हजार कोरोना चाचण्या केल्यानंतर ११०० कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. परंतु १ सप्टेंबरपासून दिवसाला पंधरा हजार चाचण्या केल्यावर दिवसाला २ हजार कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच ही कोरोनाची दुसरी लाट नसून कोरोना चाचणी वाढवल्यामुळे बाधितांची संख्या जास्त दिसत आहे. असा दावा आयुक्तांनी केला आहे. तसेच गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २.२ टक्क्यांनी कमी झाले आहे. सद्यास्थितीत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ४.५ टक्के आहे. तसे कोरोना रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा देण्यास पालिका सक्षम असल्याचे देखील आयुक्तांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी म्हटले आहे की, मुंबईतील जीम आणि रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत संबंधितांशी चर्चा सुरु आहे. कमी गर्दी ठेवून जीम व रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे. त्यानंतरच्या टप्प्यात धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबतही निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.