वरुण सरदेसाई आणि मनसे नेता संदीप देशपांडे
वरुण सरदेसाई आणि मनसे नेता संदीप देशपांडे

मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सरकारने मनावर घेतले आहे, असे दिसते आहे. वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी  हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसते आहे, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडें यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई (Mumbai).  मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सरकारने मनावर घेतले आहे, असे दिसते आहे. वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी  हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी एकदम गांभीर्यानी घेतलेले दिसते आहे, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यावरून वातावरण तापले आहे.

सुडाचे राजकारण
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात येईल. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात येईल. सरकारचा हा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सुडाचे राजकारण असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महाविकास आघाडीही  भाजपसारखी कुचक्या मनाचीच निघाली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे. यावरुन मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली म्हणाल्या, ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपासारखी कुचक्या मनाचीच निघाली.