स्वबळ म्हणणा-या महाविकास आघाडीला जनताच पळ काढायला लावेल; भाजपचा हल्लाबोल

काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाचे स्वप्न पडले आहे. पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतक-यांच्या बाहुत बळ राहिले नाही. राज्यातील कामगार देशोधडीला लागला. त्या कामगारांच्या हातात बळ राहिले नाही. बेरोजारांना रोजगार मिळत नाही, पण अशा वेळी सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे. परंतु जर अशाच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसाल तर बळ बळ करता करता ही जनताच यांना पळ काढायला लावल्या शिवाय राहणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.

    लोणावळा : काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाचे स्वप्न पडले आहे. पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतक-यांच्या बाहुत बळ राहिले नाही. राज्यातील कामगार देशोधडीला लागला. त्या कामगारांच्या हातात बळ राहिले नाही. बेरोजारांना रोजगार मिळत नाही, पण अशा वेळी सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे. परंतु जर अशाच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसाल तर बळ बळ करता करता ही जनताच यांना पळ काढायला लावल्या शिवाय राहणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.

    विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोणावळा येथील शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी चिटणीस रमेश पाळेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच विविध वेतनवाढ करार स्वाक्षरी कार्यक्रम दरेकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सर्वश्री विजय पाळेकर, बिंदरा गणतंत्रा, अॅड. राहुल पोळ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.

    राज्यातील कोट्यवधी जनतेचा विकास करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधील सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता जास्त आहे. सत्ता कशी टिकून राहिल याची काळजी त्यांना जास्त आहे. आधी एकमेकांना शिव्या घालायच्या व दुस-या दिवशी पुन्हा एकत्र नांदायचे हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे समीकरण झाले आहे असेही दरकेर यांनी स्पष्ट केले.