मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाने प्रवाश्यांना दिला असा झटका , व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल हास्याचा फटका

या व्हिडीओमध्ये तरुण अचानक थरथर कापताना दिसत आहे. मध्येच थांबतो त्याला असं कापताना पाहून सर्वजण त्याला बसण्यासाठी जागा रिकामी करून देतात. तो जागेवर बसतो आणि पुन्हा तशीच नक्कल करतो. पुढच्या काही सेकंदात हा तरुण नॉर्मल मोडवर येतो असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

    मुंबई:  लोकल, मेट्रो, मोनो किंबा बस कुठेही बसायला सीट मिळणं म्हणजे नशीब लागतं. चौथी का असेना पण ती मिळाली तरी जीव भांड्यात पडतो. ही सीट मिळवण्यासाठी एका तरूणाने मोठा जुगाड आणि कसरती म्हणण्यापेक्षा एक युक्ती सुचवली. त्यानंतर त्याची ही भन्नाट आयडीया आणि  व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    मेट्रोमध्ये गर्दी असल्यानं या तरुणाला बसायला जागाच मिळत नव्हती. जागा मिळवण्यासाठी तरुणाने एक जुगाड केला आहे. या तरुणाला त्या जुगाडानंतर सीट देखील मिळते. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक युझर्सनी खूप कमेंट्स केल्या आहेत.