rashmi shukla

राज्यातील आघाडी सरकार विरोधात आरोपांची राळ उडवून चर्चेत आलेल्या परमबीर सिंग यांच्यानंतर रश्मी शुक्ला या सनदी पोलीस अधिका-यांनी देखील आता राज्य सरकारच्या चौकशीपासून बचाव करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतच्या शुक्ला यांनी याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी केले आहे.

    मुंबई : राज्यातील आघाडी सरकार विरोधात आरोपांची राळ उडवून चर्चेत आलेल्या परमबीर सिंग यांच्यानंतर रश्मी शुक्ला या सनदी पोलीस अधिका-यांनी देखील आता राज्य सरकारच्या चौकशीपासून बचाव करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतच्या शुक्ला यांनी याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी केले आहे.

    ६ मे रोजी हैद्राबाद उच्च न्यायालयात

    मुंबई पोलिसांनी शुक्ला यांना आज दुस-यांदा चौकशीसाठी घरी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र त्यानी हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात चौकशीस बोलावण्याबाबत दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका रश्मी शुक्लांनी केली आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही शुक्ला यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिलला याचिका दाखल केली असल्याची माहिती मिळाली असून ६ मे रोजी या प्रकरणी हैद्राबाद उच्च न्यायालयात सुनवाणी होणार आहे.

    परमबीर प्रकरणात साक्षीदार

    मुंबई पोलिसांनी शुक्ला यांना आज चोकशीसाठी दुस-यांदा समन्स पाठवला होता. मात्र त्यानी त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी याचिकेत केला आहे. याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला.

    महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत

    गुप्त वार्ता विभागामध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवार २८ एप्रिल रोजी सायबर पोलीसांनी शुक्लांना समन्स बजावले होते. त्यावर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना कोरोनाची परिस्थिती पाहता हजर राहणे शक्य नसल्याचे उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिले होते. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.