The slums are corona-free; There is no restricted area in 18 wards

कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या सुरूवातील विषाणू इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला. परंतु, मार्चनंतर झोपडपट्टीवासिय देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडले. पाहता-पाहता शहरात १११ हून अधिक झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्रात बदलल्या. पालिकेने काेरोनावर नियंत्रण मिळवण्यसाठी कंबर कसली. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आली. आता मुंबईत २२ झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहेत.

  मुंबई : झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना दिलासादायक बाब असून मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्त होत आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील २४ प्रभागांपैकी १८ प्रभागांमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. तर काही प्रभागांमध्ये एक किवा दोन प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.

  कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या सुरूवातील विषाणू इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला. परंतु, मार्चनंतर झोपडपट्टीवासिय देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडले. पाहता-पाहता शहरात १११ हून अधिक झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्रात बदलल्या. पालिकेने काेरोनावर नियंत्रण मिळवण्यसाठी कंबर कसली. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट दिसून आली. आता मुंबईत २२ झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहेत.

  पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, काेरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेला कठीण परिश्रम घ्यावे लागले. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना मोठे संकट आहे. असे असतानाही प्रभागस्तरावर कोरोना नियंत्रणात आला आहे. लॉकडाऊनमुळे खूप मदत मिळाली, असे त्यांनी सांगितले.

  ‘या’ क्षेत्रातील झोपड्या कोरोनामुक्त

  उत्तर मुंबईतील बोरिवली, दहिसर, गोरेगाव, मालाड, अंधेरी पश्चिमच्या झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र मुक्त आहे. शिवाय फोर्ट, डोंगरी, चिराबाजार, कालबादेवी, ग्रांट रोड, सायन, वडाळा, किंग सर्कल, परळ, एलफिन्स्टन, धारावी, दादर, माहिम, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कुर्ला, घाटकोपरमधील झोपड्या प्रतिबंधित क्षेत्र मुक्त आहेत.

  ‘हे’ प्रतिबंधित क्षेत्र

  मुंबईत बहुतांशी झोपडपट्ट्यांमध्ये काेरोनाचे रुग्ण नाहीत. परंतु, काही क्षेत्र आहेत, जेथे अद्यापही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहे. अंधेरी पूर्वमध्ये ८, कांदिवलीत ६, भांडूपमध्ये ३, चेंबूरमध्ये २, मालाडमध्ये २ आणि भायखळा येथे एक झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहे.

  भले ही स्लम कोरोना मुक्त हो रहे हैं, लेकिन अभी खतरा टला नहीं है. लॉक डाउन में छूट के बाद एक बार फिर कोरोना मामलों में वृद्धि हो सकती है. ऐसे में स्लम के लोगों की जरा सी लापरवाही उन्हें फिर परेशान कर सकती है. लोगों को कोरोना नियमों का पालन करना चाहिए और साफ सफाई पर जोर देना चाहिए.

  जरी झोपडपट्ट्या कोरोनामुक्त आहेत, परंतु, धोका अद्यापही संपलेला नाही. लॉकडाऊनमध्ये सवलत मिळाल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे झोपडपट्टीत थोडी जरी निष्काळजी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करायला पाहिजे.

  - डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी वैद्यकीय अधिकारी, मनपा