Coastal road work is also underway in the Corona crisis; The project will be completed by 2023

मुंबई :  कोरोना काळात रखडलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला वेग आला आहे. येत्या जानेवारीपासून ‘मावळा’ तंत्रज्ञानाद्वारे अवघ्या १८ महिन्यांत दोन बोगदे खोदले जाणार आहेत. जमिनी खाली १० ते ७० मीटर आणि समुद्राखाली २० मीटर पर्यंत खोल आहेत. मुंबईतील है महत्वाकांशी प्रकल्प असून याच भूयारी मार्गातून मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. जुलै २०२३ पर्यंत कोस्टल रोडचे काम पुर्ण होईल, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख अभियंता विजय निगोट यांनी दिली.

कोरोनामुळे प्रकल्पाचे धीम्या गतीने सुरु होते. मात्र, अनलॉक शिथील केल्याने रखडलेल्या प्रकल्प कामाला आता वेग आला आहे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन टप्पे आखले आहेत. पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते प्रियदर्शनी पार्क ४.०५ किलोमीटर पर्यंतचे काम केले जाणार आहे.

या कामांत सुमारे २.०८२ किलो मीटरचे दोन बोगदे आहेत. जानेवारीपासून या बोगद्यांचे काम सुरु होईल. हे बोगदे खोदण्यासाठी ‘टीबीएम’चे ‘मराठी’ नामकरण केलेले ‘मावळा’ हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. या बोगद्यात तीन मार्गिका असतील. तसेच बोगद्यातील आपत्कालीन स्थिती हातळण्यासाटी ‘स्काडा सिस्टम कंट्रोल’ बसवले जाणार आहे. ही यंत्रणा महापालिका, मुंबई पोलीस, अग्निशमन दलासहित अशा एकूण सात प्राधिकरणांना जोडली जाईल, अशी माहिती मुख्य अभियंता निगोट यांनी दिली.

२०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

कोस्टल रोडवर जाण्यासाठी अमरसन्स येथे चार,  हाजी अली येथे ८ आणि वरळी येथे सहा ठिकाणी वळण रस्ते असतील. याकरिता भराव टाकण्याचे काम सुरु असून टीबीएम मशीन लॉंचिंग, गर्डर कास्टिंग आदी कामे प्रगतीपथावर आहेत. सध्यस्थितीत कोस्टल रोडचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२१ मध्ये ५० टक्के, २०२२ पर्यंत ८५ आणि जुलै २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार असून या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे १२.७२१ कोटींची तरतूद केली आहे. परंतु, प्रत्यक्ष कामावर ८.४२९ रुपये खर्च अपेक्षित आहे. तर आतापर्यंत १.३०० कोटी रुपये खर्च केला आहे, असे निगोट यांनी सांगितले.

कांदिवली पर्यंत कोस्टल रोडचा विस्तार

कोस्टल रोडचा पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत आहे. या प्रस्तावित प्रकल्पातील रस्त्याची लांबी १०.५८ किमी आहे. दोन्ही दिशांना यात चार-चार अशा मार्गिका, उन्नत मार्ग असतील. हा प्रकल्प तीन टप्प्यात विभागला असून त्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क, प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस, बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक असा आहे. त्यापैकी दोन टप्प्यांचे कंत्राटदार लार्सन अँड टुब्रो असून अन्य टप्प्यांचे कंत्राटदार एचसीसी आणि एचडीसी आहेत. या प्रकल्पाचा कांदिवली पर्यंत विस्तार केला जाणार आहे. यामुळेमुंबईकरांचा वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाचं ऱ्हास होणार नाही.

भूमिगत वाहनतळ

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे कोस्टल रोड प्रकल्पात भूमिगत वाहनतळ उभारले जाणार आहे. त्यामध्ये अमरसन्स येथे २०० वाहने, हाजी अली येथे १२०० आणि वरळी येथे दोन ठिकाणी २०० वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शिवाय, वरळी येथे बस आणि इतर वाहने पार्किंग करण्यासाठी एक बीआरटीएस बस डेपो प्रस्तावित आहे.