rajesh tope

रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने पून्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. ठाकरे सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लीप बाबात राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे.

    मुंबई : रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने पून्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. ठाकरे सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लीप बाबात राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे.

    आपल्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी ट्वीट करून दिली आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र, त्या क्लिपमधील आवाज माझा नाही’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

    दरम्यान, लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मांडली. नियमांच पालन केले नाही तर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना पुर्ण आदेश दिले असून लॉकडाउन हा अंत्यत शेवटचा पर्याय असेल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हंटले होता.