The spread of bird flu is increasing Pigeon houses in Mumbai in danger

मुंबईसह राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रसार वाढत आहे. मुंबईतही १२ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महानगर पालिका यांच्या समन्वयाने बर्ड फ्ल्यू रोगासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र मुंबईतील कबूतरखाने संकटात आले आहेत. त्याबाबत संबंधित विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त सतर्क आहेत. काळजी घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

मुंबई :  मुंबईसह राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रसार वाढत आहे. मुंबईतही १२ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महानगर पालिका यांच्या समन्वयाने बर्ड फ्ल्यू रोगासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र मुंबईतील कबूतरखाने संकटात आले आहेत. त्याबाबत संबंधित विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त सतर्क आहेत. काळजी घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या 1916 या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निवारणासाठी आप्तकालीन विभाग , संबंधित सहायक आयुक्त कार्यालयात अथवा पॉट वॉर रुममार्फत कार्यवाही केली जाईल. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक अभियंताच्या आदेशानुसार कर्मचारी आणि श्रमिक कामगार मृत पक्षांची विल्हेवाट लावतील.

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने रॅपीट रिस्पॉन्स टीम तयार केली असून यात दोन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार मृत पक्ष्यांची विल्हेवाट खड्यांमध्ये पुरून लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना खड्ड्यात पुरण्यासाठी पुरेसा चूनखडीचा वापर करणे आवश्यक असेल. मात्र खड्डा भटक्या प्राण्यांमार्फत उकरला जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मांस व मटन दुकानांचे सर्वेक्षण, सनियंत्रण करुन संबंधित दुकानांचा स्वच्छता आराखडा तयार करुन त्याबाबतची स्वतंत्र कार्यप्रणाली सादर करण्याचे आदेश बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. वीर जिजामाता प्राणिसंग्रहायाने सेंट्रल झू ऑथोरिटीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच मटण विक्रते, कुक्कुट पालक आणि नागरिक यांनी बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव व प्रसाराबाबत पशुवैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आय.ई.सी. अंतर्गत जनजागृती करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी जारी केल्या आहेत.