प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एसटी महामंडळात १ ते १५ डिसेंबरपर्यंत स्वच्छता विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान सातारा डेपोची बस अस्वच्छ आढळून आली. यामुळे मुंबई सेंट्रल डेपोच्या यंत्र विभागाचे महाव्यवस्थापन चांगलेच संतापले आणि त्यांनी सातारा डेपोच्या आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांचे तडकाफडकी निलंबन केले. या कारवाईमुळे सातारा आणि मुंबई एस.टी. बस डेपोतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

  • मुंबई सेंट्रल डेपोमध्ये यंत्र विभागाच्या महाव्यवस्थापकांची धडक कारवाई

मुंबई (Mumbai). एसटी महामंडळात १ ते १५ डिसेंबरपर्यंत स्वच्छता विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान सातारा डेपोची बस अस्वच्छ आढळून आली. यामुळे मुंबई सेंट्रल डेपोच्या यंत्र विभागाचे महाव्यवस्थापन चांगलेच संतापले आणि त्यांनी सातारा डेपोच्या आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांचे तडकाफडकी निलंबन केले. या कारवाईमुळे सातारा आणि मुंबई एस.टी. बस डेपोतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

स्वच्छता विशेष अभियानमध्ये बस स्थानकावरील प्रतिक्षालये, बस स्थानके, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची सोय, बसची स्वच्छता, बस स्थानकावरील स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्वच्छता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे; यादरम्यान स्वच्छतेच्या बाबतीतले आदेश न पाळणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम उभारण्यात आली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने स्वच्छतेचा पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांना बस स्थानकावरील स्वच्छता आणि बसेसच्या स्वच्छतेबद्दल हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना दिल्या आहे. आधीच एसटी प्रवाशांच्या संख्येत घट झाली असताना, सध्यास्थितीत एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा आहे. मात्र, या स्वच्छ उद्देशाला अनेक डेपो पातळीवर हरताळ फासला जात आहे.

अस्वच्छ बसेस रस्त्यावर धावत असल्याचे एसटीच्या कारवाई दरम्यान उघड होत आहे. यामध्ये विभाग नियंत्रकांना बस स्थानक स्वच्छ ठेवायचे आहे. प्रतिक्षालयाची प्रत्येक दोन तासाने स्वच्छता साफसफाई करायची आहे. वाहनतळाच्या जागा सुद्धा स्वच्छ असणे आवश्यक आहे. बस स्थानकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे. महिला पुरुषांच्या स्वच्छतागृहांची रंगरंगोटी आणि नियमित स्वच्छता ठेवायची आहे.

चालक वाचकांचे विश्रांतीगृह नियमित सॅनिटायझर करून स्वच्छ ठेवण्यात यावे. प्रवाशांना बसेसच्या वेळा किंवा बस उशिरा धावत असल्यास त्यांना योग्य माहिती मिळण्यासाठी नियंत्रण कशाने वेळोवेळी उद्घोषणा करणे आवश्यक असल्याच्या सूचना महामंडळाने एसटीच्या विभाग नियंत्रकांना प्रत्यक्षात अंमलात आणणे अनिवार्य आहे.