राज्यातल्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द! ; मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

राज्यातल्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून यंदाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

  राज्यातल्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून यंदाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

  आता या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असंही वडेट्टीवार म्हणाले.

  वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  -९ वी, १२ वी परीक्षा रद्द

  -राज्यात ५ टक्क्यात अनलॉक होणार

  -रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांत अनलॉक

  -मॉल, दुकाने सुरु कारण्याचा निर्णय

  -पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के असेल तिथे अनलॉक

  -लग्नसोहळ्यांसाठी २०० जणांना परवानगी

  -खासगी, सरकारी कार्यालये १०० टक्के उपस्थितीत सुरु होणार

  -१८ जिल्ह्यांत पूर्ण क्षमतेने अनलॉक

  -उद्यापासून १८ जिल्हे अनलॉक

  -लोकल सेवेबाबत अद्याप निर्णय नाही, पुढच्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता

  -नागपूर, नांदेड, परभणी, औरंगाबाद, ठाणे, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धु़ळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, यवतमाळ, जळगाव, वाशीम, ठाणे अनलॉक,  मुंबई मात्र दुसऱ्या टप्प्यात अनलॉक होणार.