राज्यात अखेर सोमवारपासून पाच टप्प्यात निर्बंध शिथील; प्रत्येक आठवड्यात आढावा घेवून निर्बंध कमी किंवा जास्त होणार…

७ जून पासून (सोमवार) पाच टप्प्यात शिथील करण्याबाबतचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने ४ जूनच्या मध्यरात्रीनंतर निर्गमित केला आहे. त्या नुसार येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची बाधित (अॅक्टिव्ह) रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन हे पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.

  मुंबई : राज्यात १४ एप्रिल नंतर कठोरपणे अंमलात आलेल्या निर्बंधाना अखेर येत्या ७ जून पासून (सोमवार) पाच टप्प्यात शिथील करण्याबाबतचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने ४ जूनच्या मध्यरात्रीनंतर निर्गमित केला आहे. त्या नुसार येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची बाधित (अॅक्टिव्ह) रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन हे पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.

  मुंबईकरांचा समावेश दुस-या टप्यात

  या निकषा नुसार पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे दुस-या टप्प्यात ६ जिल्हे तिस-या टप्यात दहा जिल्हे तर चवथ्या टप्प्यात दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या निकषांनुसार मुंबईकर सामान्य नागरीकांना लोकलसेवेतून प्रवासाची मुभा देण्यासाठी अद्यापही प्रतिक्षा करावी लागणार आहे.

  पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे पूर्णत: अनलॉक

  या  आदेशानुसार पहिल्या टप्प्यात बाधित रुग्णदर पाच टक्के आणि २५ टक्के ऑक्सिजन बेडची उपलब्धता असलेले १८ जिल्हे आहेत. त्यात औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यात मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.

  दुस-या टप्यातील सहा जिल्हे ५० ट्क्के अनलॉक

  दुस-या टप्प्यात पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यां दरम्यान व्यापलेले हा निकष असून त्यात सहा जिल्हे आहेत मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून या निकषा नुसार ५० % हाटेल सुरू, माल चित्रपटगृह – ५० % ,लोकल- नाही सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाक सायकल सुरू, शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली, क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९, संध्याकाळी ५ ते ९ सुरू – इनडोअर आणि आऊटडोर, शुटिंग चित्रपट सुरू, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले, लग्न सोहळा मॅरेज हाल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत, अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल,मिटींग आणि निवडणूक ५० % उपस्थितीत, बांधकाम, कृषी काम खुली, इ काॅमर्स सुरू, जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० % सुरू, शासकीय बस आसाम क्षमता १०० % सुरू, जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल.

  तिस-या टप्प्यातील ९ जिल्ह्यात अशंत: निर्बंध

  तिस-या टप्यात पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १०टक्के आणि ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले हे निकष असून त्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा सामावेश असून या ठिकाणी अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील
  माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० % खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील, लोकल रेल्वे बंद राहतील. मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा, ५० % खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू, आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार, स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल, मनोरंजन कार्यक्रम ५० % दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार, लग्नसोहळ् ५० % क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील, बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा, कृषी सर्व कामे मुभा, ई काॅम्रस दुपारी २ पर्संत, जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

  चवथ्या टप्प्यात २ जिल्ह्यात निर्बध कायम

  चवथ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० % असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांवर व्यापलेले असतील या मध्ये पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे येथे अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु, सरकारी खासगी कार्यालयात २५ % उपस्थिती राहणार, क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही, लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार, बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार, शेतीची कामे २ वाजेपर्यंत करता येणार, ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध संचार बंदी लागू असणार, सलून, जिम ५० % क्षमता सुरु राहणार, बसेस ५० % विना उभे राहणारे प्रवाशी ५ वा टप्पा, रेड झोनमध्ये, पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये, ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड ७५ % फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील.

  पाचव्या टप्प्यात रेड झोन पूर्णत: टाळेबंदी

  तर पाचव्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील. या टप्प्यात सातारा आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश असून हा टप्पा रेड झोन मध्ये आहे. या निर्बंधांबाबत ५ स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. प्रत्येक आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

  ४ जूनच्या मध्यरात्रीनंतर आदेश जारी

  राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी अनलॉक बाबतची माहिती दिली होती. त्यानंतर काल ४ जूनला मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.  सोमवार ते शुक्रवार दरम्यान दर सप्ताहाला आता या स्थिती होणा-या बदला नुसार राज्यातील जिल्ह्याचे टप्पे बदलू शकतात त्यानुसार आवश्यक ते निर्बंध शिथील अथवा कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

  पालिका व प्रशासकीय घटक

  वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकामध्ये विभाजीत करण्यात आले आहे.
  अ) बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, वसई, विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण डोंबिवली मनपा, यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल.

  ब) 34 जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल. (त्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल.)

  क) जिृल्हा अपत्ती व्यवस्था प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषीत करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल.