राज्य सरकारने शिक्षणाचा खेळ मांडला; भाजपचा हल्लाबोल

शाळा कधी आणि कशा प्रकारे सुरू करणार, खासगी शाळांकडून केली जाणारी अवाजवी शुल्क आकारणी, अभ्यासक्रमातील घोळ, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन कशा प्रकारे करणार, यापैकी कोणत्याच मुद्द्यावर या सरकारचे धोरण स्पष्ट नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शिक्षण विषयाचे काही गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो, अशा शब्दांत उपाध्ये यांनी सुनावले़.

    मुंबई : राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि शिक्षणव्यवस्थेचा खेळ मांडला आहे. राज्याची शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचाच हा डाव आहे, असा घणाघाती आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

    उपाध्ये पुढे म्हणाले, अलिकडेच उच्च न्यायालयाने तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का? असा थेट सवाल केला होता. कोर्टाने राज्य सरकारची कानउघडणीही केली होती. उच्च न्यायालयाने केलेली कानउघाडणी लक्षात घेऊन शिक्षण धोरणात सुधारणा करण्याऐवजी राज्य सरकार त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे.

    0