नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत करण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत द्यायला हवी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

    मुंबई: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत करण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत द्यायला हवी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

    कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.