राज्यात एक मुख्यमंत्री आणि चार सुपर मुख्यमंत्री आहेत; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

महाराष्ट्र अनलॉक करण्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीची घाईघाईने माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने तोंडघशी पडलेल्या महाविकास आघाडीला आता या प्रकरणावर डागडुजी करण्याची वेळ आली आहे. आघाडीत कोणतेही वाद नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्र्यांना द्यावे लागले. सरकार कोणतेही असले तरी मुख्यमंत्रीच घोषणा करतात, तसाच नियम आहे, अशी सारवासारव उपमुख्यमंत्र्यांना करावी लागली, तर राज्यात चार सुपर मुख्यमंत्री आहेत, असा टोला यानिमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगवाला आहे.

    मुंबई : महाराष्ट्र अनलॉक करण्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीची घाईघाईने माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने तोंडघशी पडलेल्या महाविकास आघाडीला आता या प्रकरणावर डागडुजी करण्याची वेळ आली आहे. आघाडीत कोणतेही वाद नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्र्यांना द्यावे लागले. सरकार कोणतेही असले तरी मुख्यमंत्रीच घोषणा करतात, तसाच नियम आहे, अशी सारवासारव उपमुख्यमंत्र्यांना करावी लागली, तर राज्यात चार सुपर मुख्यमंत्री आहेत, असा टोला यानिमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगवाला आहे.

    राज्य शासनात धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो पण महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांऐवजी दुसरेच मंत्री धोरणात्मक विषयावर बोलतात. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी हे प्रयत्न असून मुख्यमंत्र्यानी मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सध्या निर्बंधांमध्ये दुकाने चालू ठेवण्याची वेळही गैरसोयीची असून ती सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत करण्याच्या मागणी सरकारने मान्य करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    जे मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य येत नाही. परंतु त्यापूर्वीच त्यांचे पाच सुपर मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील, असे सांगतो. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. किमान काम करून तरी श्रेय घ्यावे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.