राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा

पुढील चार दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाण्यात आज तर मुंबईतील काही भागांत उद्यापासून अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    मुंबई –  मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र संततधार होणाऱ्या कोसळधार पावसामुळे अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. तसेच अनेक रस्ते आणि भाग जलमय झाले आहेत. दरम्यान, राज्यात पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

    ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    पुढील चार दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाण्यात आज तर मुंबईतील काही भागांत उद्यापासून अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्या कोल्हापुरात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

    पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे. पण तरीही सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.