राज्यात पुढील दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

राज्यभरात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून काही भागांत धुमशान घातले आहे. तसेच पुढील दोन दिवसांत मराठवाडा (Marathwada)आणि मध्य महाराष्ट्रातील (Central Maharashtra) काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rains) अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. याबाबत वेधशाळेनं पत्रक जारी केलेले आहे. त्याच्या पुढच्या २ दिवसात म्हणजे, गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई : राज्यभरात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून काही भागांत धुमशान घातले आहे. तसेच पुढील दोन दिवसांत मराठवाडा (Marathwada)आणि मध्य महाराष्ट्रातील (Central Maharashtra) काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rains) अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. याबाबत वेधशाळेनं पत्रक जारी केलेले आहे. त्याच्या पुढच्या २ दिवसात म्हणजे, गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई, ठाणे सहीत भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाजही कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंबं फुटली आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आता मजुरांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

कोरोनाचं संकट, बाजारातली मंदी, मजुरांची कमतरता यामुळे मार्ग कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील प्रमुख पिकं असलेले भाताचे पिक अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाले आहे.