राज्याचे प्रशासकीय प्रमुख केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर; मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयची नोटीस !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या वसुली प्रकरणाचा तपास आता राज्याच्या प्रशासकीय अधिका-यांपर्यंत येवून पोहोचला आहे. मंत्रालयातील उपसचिव कैलाश गायकवाड यांची ईडीने आठ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केल्यानंतर आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे(Chief Secretary Sitaram Kunte ) आणि पोलीस महासंचालक संजय पांडे(Director General of Police Sanjay Pandey ) यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने समन्स बजावल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र सीबीआयकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही.

  मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या वसुली प्रकरणाचा तपास आता राज्याच्या प्रशासकीय अधिका-यांपर्यंत येवून पोहोचला आहे. मंत्रालयातील उपसचिव कैलाश गायकवाड यांची ईडीने आठ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केल्यानंतर आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे(Chief Secretary Sitaram Kunte ) आणि पोलीस महासंचालक संजय पांडे(Director General of Police Sanjay Pandey ) यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने समन्स बजावल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र सीबीआयकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही.

  मात्र, सीबीआयकडून कुंटे आणि पांडे यांना कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे राहायचे, याबाबतची अधिकृत समन्स दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीकडून देखील या प्रकरणी चौकशी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंद केले आहेत. त्याच तपासाचा एक भाग म्हणून आता सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.

  गुरुवारी दुपारीच भाजपनेते किरिट सोमैय्या यानी याबाबत पत्रकार परिषदेत सूतोवाच केले होते. रशमी शुक्ला यांच्याशी संबंधीत बदल्यांच्या प्रकरणात राज्याच्या मुख्यसचिवांची तसेच पोलीस  प्रमुखांची चौकशी केली जाणार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र या प्रकरणात शुक्ला यांनी अहवाल दिला त्यावेळी तत्कालीन पोलीस प्रमुख  सुबोध जयस्वाल आता सीबीआय प्रमुख झाले आहेत हे विशेष असल्याचे सांगण्यात येत आहे.

  राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुखाना नोटीस बजावल्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात सीबीआयला सगळ्यां पैलूंचा विचार करुन अनिल देशमुख यांच्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास करायचे आदेश दिले आहेत. त्या तपासात हवाला, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, शंभर कोटी वसूली तसेच फोन टॅपिंग प्रकरण हे सगळे प्रकरण येणार.

  या तपासा दरम्यान वेगवेगळ्या खात्याशी संबंधित सर्वांनी सहकार्य करुन माहिती द्यावी. मात्र चौकशीसाठी बोलावले किंवा समन्स बजावला याचा अर्थ ती व्यक्ती गुन्हेगार असते असे नाही. संबंधित व्यक्तीकडे जी माहिती आहे ती द्यावी लागते. याच चौकशीतून महत्वाची माहिती मिळते ज्यातून तपास यंत्रणा योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकते”, असे किरीट सोमय्या म्हणाले.

  दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणात साक्षीसाठी दोघांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. पण संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अधिकाऱ्यांनी सीबीआयसोबत चर्चा केली होती. त्यामुळे सीबीआयला जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात येण्याची विनंती दोन्ही अधिकाऱ्यांनी केली आहे.