लसींच्या टंचाईतही राज्याची लसीकरणात आघाडी;  उद्दीष्टाच्या २३ टक्के लसीकरण पूर्ण

आरोग्य कर्मचा-यांची लोकसंख्या १५ लाख ७ हजार असून त्यापैकी ११ लाख ५६ हजारांना पहिला डोस तर ७ लाख १७ हजार कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची एकूण लोकसंख्या १९ लाख ८२ हजार आहे. त्यापैकी १६ लाख ३७ हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे.

    मुंबई : लशींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असतानाही महाराष्ट्राने लसीकरणात देशाच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. देशात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला असताना राज्यात आतापर्यंत २ कोटी ०६ लाख २४ हजार ९३० नागरिकांचे लसीकरण आले. राज्याच्या १२ करोड ८ लाख या एकूण लोकसंख्येपैकी १८ वयापेक्षा जास्त वयोगटातील सहा कोटी आणि ४५ पेक्षा जास्त वयोगटातील दिड कोटी अश्या साडे सात कोटी नागरीकांना लसीकरण करायचे असून त्यापैकी २ कोटी ०६ लाख २४ हजार ९३० नागरिकांचे म्हणजेच २३ टक्के लसीकरण करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

    आतापर्यंत ९.७ टक्के नागरिकांना लस
    यामध्ये १ कोटी ५५ लाख जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ४३ लाख ७ हजार जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. यात १८ ते ४५ वयोगटातील ६ लाख ८३ हजार जणांचा समावेश आहे. तर ४५ वयोगटातील २९ लाख १ हजार लोकांना लस देण्य़ात आली आहे. काल दिवसभरात १ लाख २० हजार ७४३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात १८ ते ४५ या वयोगटाची लोकसंख्या ५ कोटी ७१ लाख आहे. त्यापैकी ६ लाख ८३ हजार जणांना लस देण्यात आली. तर ४५ पुढील वयोगटाची लोकसंख्या १ कोटी २७ लाख आहे. त्यापैकी २९ लाख १ हजार लोकांना लस देण्य़ात आली म्हणजे आतापर्यंत ९.७ टक्के लोकांना लस देण्यात आली आहे.

    अत्यावश्यक सेवेतील ८५ टक्के लसीकरण
    आरोग्य कर्मचा-यांची लोकसंख्या १५ लाख ७ हजार असून त्यापैकी ११ लाख ५६ हजारांना पहिला डोस तर ७ लाख १७ हजार कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची एकूण लोकसंख्या १९ लाख ८२ हजार आहे. त्यापैकी १६ लाख ३७ हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर७ लाख ४४ हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणात सर्वाधिक लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यात ६२. ०७ टक्के झाले आहे.