The storm of the Chief Minister's program, which appealed to the people not to 'crowd' on Facebook; Will action be taken against the Chief Minister?

अशीच गर्दी राहिली तर  पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबईकरांना दिला. मात्र त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला आलेले तेथील गर्दीचे फोटो व्हायरल झाले आहेत. मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याला झालेल्या गर्दीवरुनही भाजपसह अनेक नेटक-यानी सोशल मिडीयावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. उद्घाटनासाठी मेट्रो स्थानकावर गर्दी जमावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई होणार का?, अशा स्वरुपाचे प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांनी ट्विटवरुन उपस्थित केले.

    मुंबई : अशीच गर्दी राहिली तर  पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबईकरांना दिला. मात्र त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला आलेले तेथील गर्दीचे फोटो व्हायरल झाले आहेत. मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याला झालेल्या गर्दीवरुनही भाजपसह अनेक नेटक-यानी सोशल मिडीयावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. उद्घाटनासाठी मेट्रो स्थानकावर गर्दी जमावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई होणार का?, अशा स्वरुपाचे प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांनी ट्विटवरुन उपस्थित केले.

    वाहतूक कोंडी आणि गर्दीबद्दल चिंता

    खूप दिवसांनी घराबाहेर पडल्यानंतर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) डहाणूकरवाडी ते आरे स्थानका दरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोमवारी झाला. यावेळी दोन मार्गिकांचे ई लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर दिसलेल्या वाहतूक कोंडी आणि गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली.

    तर पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील

    करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी ही बंधने अजून उठवलेली नाहीत. करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. पण मुंबईतील आजची गर्दी चिंताजनक आहे. अशीच गर्दी राहिली तर  पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबईकरांना दिला. मात्र त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला आलेले तेथील गर्दीचे फोटो व्हायरल झाले.

    गर्दी करू नका’असे म्हणणारा मुख्यमंत्री हाच का?

    मुंबई भाजपानेही मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांवरील वाहतुक कोडींसंदर्भात चिंता व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. “धक्का आम्हालाही बसला मेट्रो ट्रायलच्या कार्यक्रमाला तुम्ही जमवलेली गर्दी पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महोदय. फेसबुकवर सतत ‘गर्दी करू नका’असे आवाहन करणारा मुख्यमंत्री हाच का? असा सवाल उभा राहिला आमच्या मनात.तोंडाच्या त्या वाफा फक्त जनता जनार्दनासाठी असतात का?”, असा टोला भाजपाने लगावला आहे.