संजय पांडे, पोलिस महासंचालक, मुंबई
संजय पांडे, पोलिस महासंचालक, मुंबई

राज्याच्या पोलीस दलातील मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला (former Mumbai Police Commissioner Parambir Singh and Rashmi Shukla) यांच्या सारख्या बड्या अधिका-यांनी (senior officials in the state police force) थेट सरकारवर आरोप केल्यानंतर पोलीसांच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. त्यातच मागील सप्ताहात पोलिस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey's) यांच्या पूर्वसूचना न देता अचानक रजेवर जाण्याच्या राजकीय चर्चा रंगल्याने नवी भर पडली होती.

  मुंबई (Mumbai).  राज्याच्या पोलीस दलातील मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला (former Mumbai Police Commissioner Parambir Singh and Rashmi Shukla) यांच्या सारख्या बड्या अधिका-यांनी (senior officials in the state police force) थेट सरकारवर आरोप केल्यानंतर पोलिसांच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. त्यातच मागील सप्ताहात पोलिस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey’s) यांच्या पूर्वसूचना न देता अचानक रजेवर जाण्याच्या राजकीय चर्चा रंगल्याने नवी भर पडली होती. मात्र आता या सा-या प्रकरणाचा खुलासा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस महासंचालकांनी केवळ कुटुंबियांना तातडीने भेटण्यासाठी पूर्वनियोजीत रजा (pre arranged leave) घेतल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे.

  गृहसचिव आणि गृहमंत्र्यांना पूर्वकल्पना
  संजय पांडे यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार रविवार सायंकाळ पर्यंत संजय पांडे मुंबईतच होते. त्यांनी दोन बैठकांना हजेरी देखील लावली होती. दोन दिवसांपूर्वीच पांडे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याशी आणि गृहमंत्री यांच्याशी दोन दिवसांच्या सुट्टीवर जाण्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांना जाण्यास अनुमती देखील देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना रविवार पर्यंत थांबण्यास सांगण्यात आले त्यानुसार रविवारच्या बैठका आटोपून पांडे विमानाने चंदीगढ येथे दाखल झाले होते.

  विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले
  चंदीगढ येथे पांडे यांच्या पत्नी राहत असून, त्यांचा मुलगा अमेरिकेत राहण्यास आहे. पत्नीला भेटण्यासाठी ते चंदीगढ येथे आले असतानाच  राज्यात चक्रीवादळाच्या आणिबाणीची परिस्थिती वाईट झाली. यावेळी पोलिस विभागाच्या प्रमुखाचे अचानक अशाप्रकारे रजेवर जाण्याची राजकीय चर्चा रंगली. त्यामुळे संजय पांडे यांनी दुस-या दिवशी सोमवारीच पुन्हा कर्तव्यावर हजर होण्याची तयारी केली, मात्र चक्रीवादळामुळे मुंबईला येणारी विमानसेवा बंद असल्याने संजय पांडे चंदीगढ येथे अडकून पडले. रात्रीपर्यंत मुंबईतील वादळ शांत होऊन विमानसेवा सुरू झाल्यावर संजय पांडे हे कर्तव्यावर हजर झाल्याची माहिती पांडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

  राजकीय चर्चाना ऊत
  दरम्यान मुंबईत आणि कोकणपट्टीवर चक्रीवादळ असताना पोलिस महासंचालक संजय पांडे राज्याबाहेर सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नेते नाराज असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात असल्याचे सांगण्यात येवू लागले होते. चक्रीवादळ असताना पोलिस महासंचालक पदाची धुरा सांभाळणारे संजय पांडे विनापरवानगी चंदिगढला गेलेच कसे? असा सवाल विचारण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

  विरोधकांकडून टीका  
  शिवसेनेकडून पांडे यांच्यावर कारवाई होण्याची मागणी होत असताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मात्र शिवसेनेवरच टीका केली होती. शिवसेनेची राजी-नाराजी ही सोयीनुसार बदलत असते. परमबीर सिंग यांच्या आरोपांची जेव्हा संजय पांडे चौकशी करत होते, तेव्हा त्यांच्यावर सरकार खूश होते. पण आता पांडे अचानक रजेवर गेल्याने शिवसेना अचानक नाराज का झाली, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. सध्या कोरोना आणि चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रावर घोंघावत असताना, अशा संकटकाळी राज्यातील महत्त्वाच्या अधिका-यांनी राज्यात असणे अत्यंत गरजेचे आहे.

  आपत्ती व्यवस्थापनासाठी तर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी राज्यात असायलाच हवे होते. पण शिवसेनेला कधी कळवळा येतो, तर कधी त्यांची नाराजी एकदम उफाळून येते. त्यामुळे या प्रसंगानुरुप त्यांच्या बदलत्या भूमिकेचा शोध घेणे गरजेचे आहे, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे.