राज्यातील निवासी डाॅक्टरांचा संप सुरुच; डाॅक्टरांच्या मागण्यांबाबत चर्चेसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांबराेबर चर्चा नाही

कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने १ ऑक्टोबर सकाळपासून राज्यातील रुग्णालयात बेमुदत आंदोलन पुकारले आहे. शनिवारी संपाचा दुसरा दिवस असून निवासी डाॅक्टरांच्या मागण्यांसंदर्भातील चर्चेसाठी वैद्यकीय मंत्री व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप वेळ दिला नसल्याचे मार्ड संघटनेचे म्हणणे आहे. ज्यामुळे संप सुरुच राहणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

    मुंबई: कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने १ ऑक्टोबर सकाळपासून राज्यातील रुग्णालयात बेमुदत आंदोलन पुकारले आहे. शनिवारी संपाचा दुसरा दिवस असून निवासी डाॅक्टरांच्या मागण्यांसंदर्भातील चर्चेसाठी वैद्यकीय मंत्री व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप वेळ दिला नसल्याचे मार्ड संघटनेचे म्हणणे आहे. ज्यामुळे संप सुरुच राहणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

    दरम्यान, शनिवारी दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची बाह्य रुग्ण कक्षात (ओपीडी) नियुक्ती केली. पण २ ऑक्टाेबर सार्वजनिक सुट्टी असल्याने पालिका रुग्णालयात शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक शस्त्रक्रिया नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या असल्याचे पालिका रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे दिलेले आश्वासनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ‘मार्ड’ संघटनेने बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाची सुरुवात ओपीडीपासून करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून केईएम, नायर, सायन आणि जे.जे. रुग्णालयासह राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. या संपामध्ये राज्यातील ५५०० मार्डचे डॉक्टर सहभागी झाले आहेत.

    रुग्णालयातील ओपीडीतील कामकाज हे निवासी डॉक्टरांमार्फतच चालते. त्यामुळे ओपीडीवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली होती, पण संपाच्या दुसऱ्या दिवशी देखील ओपीडीवर काेणताही परिणाम झाला नाही, त्यातच शनिवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने पािलका ओपीडीकडे शुकशुकाट दिसून आला.

    मागील दाेन दिवसांपासून राज्यभरातील निवासी डाॅक्टरांचा संप सुरु आहे. शुक्रवारी संपाचा पहिला दिवस हाेता, पहिल्या दिवशीही निवासी डाॅक्टरांच्या संघटनेबराेबर मागण्यां संदर्भात काेणतीही चर्चा केली नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. याशिवाय शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी वैद्यकीय शिक्षण व संशाेधन विभागाचे संचालक डाॅ. दिलीप म्हैसेकर यांनी चर्चेसाठी संघटनेच्या प्रतिनिधींना संपर्क केला हाेता पण संध्याकाळी उशीरापर्यंत प्रतिनिधींना बाेलविण्यात नसल्याचे, मध्यवर्ती (सेंट्रल) मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे-पाटील यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी देखील अद्याप चर्चेसाठी वेळ दिली नाहीये, आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबराेबरही चर्चा करण्यास तयार आहाेत, असे डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे-पाटील म्हणाले.