१२ सदस्यांचे निलंबन हे राजकीय षडयंत्र ; भाजप न्यायालयात जावून दाद मागेल :ऍड आशिष शेलार यांची माहिती

पिठासनावर गेल्यावर भास्कर जाधव यानी जे वर्णन केले त्यात त्यांनी देखील तेथे काही सेना सदस्य असल्याचा उल्लेख केला होता. मात्र त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून आमच्यावर आम्ही न केलेल्या गुन्ह्याचे आरोप लावले आहेत ते देखील आम्हाला माहिती आहे असे शेलार म्हणाले. ते म्हणाले की या कारवाईने आम्ही घाबरून जाणार नसून महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना आम्हाला किती  आमच्या संख्याबळाला किती घाबरले आहेत तेच दिसून येत  आहे. 

  मुंबई :  विधानसभेत १२ सदस्यांचे निलंबन हे राजकीय षडयंत्र असुन त्याबाबत भाजप न्यायालयात जावून दाद मागेल अशी माहिती भाजप नेते ऍड आशिष शेलार यानी दिली आहे. विधानसभेत भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्याच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी न्यायालयात जावून दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी १२ निलंबित सदस्यांसह कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती भाजप नेते ऍड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

  आमचे म्हणणे मांडू न देताच कार्यवाही
  ऍड शेलार म्हणाले की, कोणताही गुन्हा केला नसताना, काहीच चुकीची घटना घडली नसताना कपोल कल्पीत वर्णन करून आमच्यावर दोषारोप लावण्यात आले आहेत. आम्हाला नैसर्गिक न्याय तत्वानुसार सदनात आमचे म्हणणे मांडू न देताच कार्यवाही करण्यात आली, जी घटना घडल्याचे सांगण्यात येते ती घडलीच नाही त्यामुळे त्याचे काही पुरावे नाहीत. या शिवाय तेथे उपस्थित शिवसेना सदस्यांना वगळून केवळ आमच्या विरोधात राजकीय सूडाची कारवाई करण्यात आली आहे असा आरोप शेलार यानी केला आहे.

  कारवाईने घाबरून जाणार नाही
  ते म्हणाले की, पिठासनावर गेल्यावर भास्कर जाधव यानी जे वर्णन केले त्यात त्यांनी देखील तेथे काही सेना सदस्य असल्याचा उल्लेख केला होता. मात्र त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून आमच्यावर आम्ही न केलेल्या गुन्ह्याचे आरोप लावले आहेत ते देखील आम्हाला माहिती आहे असे शेलार म्हणाले. ते म्हणाले की या कारवाईने आम्ही घाबरून जाणार नसून महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना आम्हाला किती  आमच्या संख्याबळाला किती घाबरले आहेत तेच दिसून येत  आहे.

  राजकीय षडयंत्र रचण्यात आले
  आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच हे दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप शेलार यांनी केला. ते म्हणाले की जे काही घडले त्यानंतर आम्ही तरी देखील काही चुकीचे वाट असेल तर मी माफी मागेन असे सांगत जाधव यांची गळाभेट घेवून बाहरे पडलो मात्र नंतर जाणिवपूर्वक खोटी कहाणी तयार करून राजकीय षडयंत्र रचण्यात आले आहे. त्याबाबत उपलब्ध सीसीटिव्ही फुटेज आम्ही मागितले आहे. असेही शेलार अन्य प्रश्नाच्या उत्तरात बोलताना म्हणाले.

  चर्चा न करताच गणेश मूर्तीबाबत नियम आणि निर्बध
  गणेश मूर्तीच्या उंचीवरून राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षात प्रथमच कोणाशीही चर्चा न करता उंची बाबत नियम आणि निर्बध जारी केले आहेत. त्यानंतर आज सेना भवन येथे चोरी चोरी चुपके चुपके बैठका घेण्याचे धंदे सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्र्यानी याबाबत सर्व सामाजिक राजकीय पक्षांच्या तसेच मंडळाच्या पदाधिकारी यांची बैठक घेण्याची अ आवश्यकता आहे असे शेलार म्हणाले. ते म्हणाले की सरकारने जुलमी पध्दतीने जे आदेश जारी केले आहेत त्यांचा काही परिणाम होणार नाही कोरोनाच्या निकषा मुर्तीच्या उंचीचा काय संबंध आहे ते स्पष्ट झाले पाहीजे. ज्या मुर्तीकारांच्या मुर्ती तयार आहेत त्यांचे नुकसान होत असल्याने त्यांना सरकारने भरपाई द्यायला हवी असेही शेलार म्हणाले.