बारा आमदारांच्या निलंबनाने भाजपचे राजकीय अवसान गळाले, अधिवेशनानंतर भाजपचा प्रभाव कमी

भाजपाच्या बारा सदस्यांना निलंबीत केल्यानंतर आक्रमक होत भाजपाने राज्यभरात जोरदार आंदोलने केली. तर विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घालत देवेंद्र फडणवीस यानी आवारात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा सुरु केली. मात्र काही वेळाने विधानसभेच्या तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यानी आक्षेप घेत मार्शलना पाठवून भाजप नेत्यांकडील माईक आणि स्पीकर काढून घेण्यात आले.

  मुंबई: विधिमंडळ अधिवेशनापूर्वी सत्ताधारी आघाडीवर ईडी सीबीआय च्या तपासाच्या बातम्यांमुळे राजकीय दबाव निर्माण झाल्याचे वातावर  विरोधीपक्षाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईने पार मावळून गेले आणि भाजप राजकीय आघाडीवर मागे ढकलली गेली.

  अधिवेशना नंतर भाजपचा प्रभाव कमी

  त्यातच सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडून आणण्याचा तसेच  केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे कायदे करण्याचा सूर देखील मावळ ला आहे. तर या बाबत मसुदा सध्या सदनाच्या पटलावर ठेवून सत्ताधारी घटक पक्षांचे समाधान करण्यात आघाडीने यश मिळवल्याचे दिसून येत आहे त्यामुळे दोन दिवसांच्या अधिवेशना नंतर भाजपचा प्रभाव कमी करून सत्ताधारी आघाडीने जश्यासतसे राजकीय ऊतर दिल्याचे मानले जात आहे.

  भाजप नेत्यांचे माईक काढून घेतले

  भाजपाच्या बारा सदस्यांना निलंबीत केल्यानंतर आक्रमक होत भाजपाने राज्यभरात जोरदार आंदोलने केली. तर विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घालत देवेंद्र फडणवीस यानी आवारात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा सुरु केली. मात्र काही वेळाने विधानसभेच्या तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यानी आक्षेप घेत मार्शलना पाठवून भाजप नेत्यांकडील माईक आणि स्पीकर काढून घेण्यात आले. त्यानंतरही या सदस्यांनी कामकाजात भाग घेतला नाही तर रवि राण यांच्यासारख्या सदस्यांनी राजदंड पळविण्याचे काम केले. सदनाबाहेर भाषणे करत राज्य सरकारच्या कारभारावर भाजपाच्या नेत्यांनी अत्यंत बोचरी टीका केली.

  नाहीतर पिंजऱ्यात राहाल

  यावेळी माजी अर्थमंत्री आणि भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल दरवाढ हे राज्यसरकारचे पाप असल्याचे म्हटले आहे. “धान्यामध्ये सरकार कमिशन खात आहे. देवाच्या न्याय व्यवस्थेतून कसे सुटाल?” असा सवालही त्यांनी केला.”पुढच्या जन्मी, नाहीतर पिंजऱ्यात राहाल. राज्याचे मुख्यमंत्री हे जोडे देण्याची भाषा करत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काँग्रेसला जोडे देण्याची भाषा करता” असे मुनगंटीवार म्हणाले. “माझी दारू, माझे आरोग्य असा नारा सरकारने द्यायला हवा. अजितदादा पवार यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या केली” असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

  हे शेंबडयासारखे आहेत

  नितेश राणे काय म्हणाले की, १२ सहकारी ओबीसी आणि मराठा समाजाठी लढले आहेत. महाराष्ट्रासाठी कोणी लढत असेल तर त्याचा सार्थ अभिमान आहे” असे नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यानी भास्कर जाधव यांच्यावर टिका करताना हे शेंबडयासारखे आहेत, म्हणून १२ आमदार निलंबित केले अशी टाक केली आहे.

  सरकार मुस्काटदाबी करण्याचे काम करते

  प्रविण दरेकर काय म्हणाले की  हा लोकशाहीचा खून, हत्या करण्याचे काम ठाकरे सरकारने केले. विधिमंडळात शेतकरी, ओबीसी, मराठा आरक्षण आणि एमपीएसई असे गंभीर विषय असताना, सरकार मुस्काटदाबी करण्याचे काम करते असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. जनतेचे प्रश्न, जनतेच्या मनातील असंतोष सभागृहात मांडण्यापासून रोखण्याचे काम हे सरकार करते असे प्रवीण दरेकर म्हणाले.