मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते; भाजप नेत्यांची मंदिरं सुरु करण्याची मागणी

मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर असल्याचे म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरं सुरु करण्याची मागणी केली आहे.

    मुंबई : कोरोनाचा संसर्ग हळू हळू कमी होत असताना शासनाने सर्वत्र व्यवहार पूर्ववत करून निर्बंध शिथिल केले आहेत. यात बार, मॉल, हॉटेल्स सर्व सुरळीत सुरू झालेले असताना मात्र राज्यातील मंदिरे अद्याप दर्शनासाठी बंद आहेत. भाजप नेत्यांची मंदिरं सुरु करण्याची मागणी लाऊन धरली आहे.

    मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर असल्याचे म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरं सुरु करण्याची मागणी केली आहे.

    मंदिरे सुरु करण्याच्या मागणीबाबत नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? पाहा व्हिडिओ

    महाराष्ट्रात सर्व व्यवहार सुरू केलेले असतानाच धार्मिक स्थळ दर्शनासाठी बंद का? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला. मंदिर दर्शनासाठी खुली करण्याची मागणीही त्यांनी केली.