एक दोन नव्हे तर तब्बल 31 पोलिस अधिकाऱ्यांच्या ठाकरे सरकारने केल्या बदल्या; कुणाची कुठे बदली? पाहा संपूर्ण यादी

गेल्या काही दिवसांपासून महाआघाडी सरकारने वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या सुरु केल्या आहेत. त्याच अंतर्गत आज तब्बल ३१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात  आल्या आहेत.  

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाआघाडी सरकारने वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या सुरु केल्या आहेत. त्याच अंतर्गत आज तब्बल ३१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात  आल्या आहेत.

    राखीव पोलीस दलाच्या समादेशक नीवा जैन यांची पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, एस. व्ही. पाठक यांची उपायुक्त मुंबई शहर, मुख्यालयातील उपायुक्त एन. अंबिका यांना प्रशिक्षण केंद्र मरोळ, शशीकुमार मिना यांची पुणे येथे राज्य राखीव दलाचे समादेशक पदी बदली करण्यात आली आहे. नवी मुुंबईचे उपायुक्त प्रवीण पाटील धुळ्याला अधीक्षक, वाशिमचे अधीक्षक वसंत परदेशी पुणे येथे राखीव दलाचे समादेशक, नागपूर शहर उपायुक्त विनीता साहू पुणे येथे राखीव दलाच्या समादेशक, मुंबई व्हीआयपी सुरक्षा उपायुक्त शहाजी उमाप नाशिक ग्रामीण अधीक्षक, पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक एस. जी. दिवाण कोल्हापूर येथे राखीव दलाचे समादेशक म्हणून बदली.

    पुणे शहर उपायुक्त अशोक देशमुख पुणे आर्थिक शाखेत,  औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षक मोक्षदा पाटील औरंगाबाद येथे लोहमार्ग अधीक्षक, नागपूर ग्रामीणचे अधीक्षक राकेश ओला नागपुरात एसीबीचे अधीक्षक, अमरावतीचे अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. मुुंबई शहर उपायुक्त, नंदुरबारचे अधीक्षक महेंद्र कमलाकर  मुुंबई शहर उपायुक्त, नागपूर परिमंडळ ५ चे उपायुक्त निलोत्पल  मुुंबई शहर उपायुक्त, गडचिरोलीचे अधिक्षक मनिष कलवानिया नागपूर शहर उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    मुंबई गुप्तवार्ता विभागाचे अधीक्षक सुधाकर पठारे ठाणे शहर उपायुक्त, औरंगाबाद एटीएसचे अधीक्षक अविनाश बारगल अमरावती ग्रामीण अधीक्षक, मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त नंदकुमार ठाकूर नागरी हक्क संरक्षण शाखेत नांदेड येथे अधीक्षक, अनु. जाती – जमाती आयोगाचे नितीन पवार मुंबई शहर उपायुक्त, ठाणे महामार्ग सुरक्षेचे अधीक्षक दिगंबर प्रधान पुणे प्राधिकरणात दक्षता अधिकारी, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तुषार दोषी यांची पुणे एटीएसला अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

    मुंबई शहर उपायुक्त श्रीकांत परोपकारी नागपूर प्रशिक्षण केंद्र, नाशिक ग्रामीण अधीक्षक सचिन पाटील मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त, धुळे अधीक्षक चिन्मय पंडित नागपूर शहर उपायुक्त, मुंबई गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त विजय मगर नागपूर ग्रामीण अधीक्षक, मुंबई सशस्त्र दलाचे उपायुक्त निमित गोयल औरंगाबाद ग्रामीण अधीक्षक, कोल्हापूर नागरी हक्क संरक्षण अधीक्षक पी. आर. पाटील नंदुरबार अधीक्षक, बच्चन सिंग यांना वाशिम अधीक्षक, उस्मानाबाद अधीक्षक राज तिलक रोशन मुंबई शहर उपायुक्त तर राज्य राखीव दलाचे समादेशक पवन बनसोड यांची औरंंगाबाद अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.