चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी कृती ठाकरे सरकार करतंय : केशव उपाध्ये

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आता उच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असुन यामध्ये देशमुख यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार उच्च न्यायालयातल्या याचिकेतल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी प्रतिवादी म्हणून आपली भूमिका मांडणे हे महाराष्ट्राला शोभणारे आहे का?” असा सवालही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

    माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यावर १०० कोटींची खंडणी वसूलीबाबत केलेल्या आरोपांचे पत्र, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलेले पोलीस खात्यातील बदल्यांचे रॅकेट या घडामोडींनंतर संबंधित मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याऐवजी या आतल्या गोष्टी बाहेर पडल्याच कशा? आपली ही चोरी नेमकी कशी पकडली गेली याचीच चिंता संपूर्ण मंत्रिमंडळाला लागली आहे.तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा होण्याऐवजी या गोष्टी बाहेर आल्याच कशा याचीच चिंता संपूर्ण मंत्रिमंडळाला लागल्याचे चित्र बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. अंतिमत: चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी कृती ठाकरे सरकार करताना पाहायला मिळत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरूवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.