परमबीर सिंग यांच्या पत्राची ठाकरे सरकारने घेतली दखल, चौकशी समितीची घोषणा करण्याची शक्यता

परमबीर सिंग यांनी पत्रात केलेल्या गंभीर आरोपांची राज्य सरकारने दखल घेतली आहे. राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायाधिशांची चौकशी समिती बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने एका निवृत्त न्यायाधिशांच्या चौकशी समितीच्या मार्फत चौकशी करण्याची शक्यता आहे.

    परमबीर सिंग यांनी पत्रात केलेल्या गंभीर आरोपांची राज्य सरकारने दखल घेतली आहे. राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायाधिशांची चौकशी समिती बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे.

    येत्या गुरुवारी परमबीर सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात येईल. त्याच दिवशी समन्वय समितीची बैठक होऊन महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केलेल्या सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही असं म्हणत देशमुखांचा राजीनामा घेणार नाही’, असं स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे भाजपने अनिल देशमुख यांची भेट झालीच होती, असा दावा केला आहे.