अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा प्रतीकात्मक फोटो
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा प्रतीकात्मक फोटो

दुसऱ्या फेरीमध्ये अवघ्या २८  हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे तिसऱ्या फेरीमध्ये नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशाची संधी निर्माण झाली होती. परंतु तिसरी फेरी नव्वद पार राहिल्याने इतर विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

मुंबई : अकरावी प्रवेशाची  तिसरी यादी १५ डिसेंबरला जाहीर झाली असून ही यादीही नव्वद पार राहील्याने ८० टक्के गुण असलेले विद्यार्थी निराश झाले आहेत.

दुसऱ्या फेरीमध्ये अवघ्या २८  हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे तिसऱ्या फेरीमध्ये नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशाची संधी निर्माण झाली होती. परंतु तिसरी फेरी नव्वद पार राहिल्याने इतर विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

तिसऱ्या फेरीमध्ये १ लाख १६ हजार ८० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत. यामध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. ६ हजार १७९ विद्यार्थ्यांना पहिल्या  पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना १८ डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.

अकरावी प्रवेशासाठी १ लाख १९ हजार १७१ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी १ लाख १६ हजार ८० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामधील कॉमर्सच्या २८ हजार ८३९, सायन्सच्या १२ हजार ४५३, कला शाखेच्या ३ हजार ९०८ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एससीसी मंडळाचे ४२ हजार ३६६ विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाली असून, त्याखालोखाल आयसीएसई १ हजार २८९, सीबीएसई १ हजार १३६, एनआयओएस २७१, आयजीसीएसई १५१ आणि आयबी मंडळाच्या फक्त एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे.

खुल्या वर्गातून अर्ज केलेल्या ९७ हजार ३०१ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार २५ विद्यार्थ्यांची निवड झाली झाली आहेत. एससीच्या ८६२६ पैकी ४०५६, ओबीसीच्या ७४२४  पैकी ३७२९, एसटीच्या ३६२ पैकी २३७, एनटी (बी)च्या ५५७ पैकी ३१६ विद्यार्थ्यांची तर ईडब्ल्यूएसच्या ६० पैकी ५७ विद्यार्थींची निवड झाली आहे.

तिसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय ६ हजार १७९ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे कॉलेज ८०८६, तिसऱ्या पसंतीचे कॉलेज ६८३७ विद्यार्थ्यांना मिळाले आहे.