corona

मुंबई : मुंबईत महालिकेच्या के ई एम आणि नायर रुग्णालयात कोरोना विषाणूवरिल लस कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १९जणांना ही लस देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टीट्युट यांच्या मार्फत कोव्हिशिल्ड लस बनवण्यात येत आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात आणि नायर रुग्णालयात प्रत्येकी शंभर अशा एकूण दोनशे जणांना तिसऱ्या टप्प्यातील लस देण्यात येणार आहे. नायर रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीची चाचणी सुरु झालीय. आतापर्यंत १९ जणांना लस देण्यात आली आहे. टप्प्या टप्प्याने शंभर जणांना लस देण्यात येणार आहे. लसीच्या चाचणीसाठी स्वंयसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले होते.

रुग्णालयाच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. कोव्हिशिल्ड लसीच्या चाचणीसाठी १५० स्वंयसेवकांनी नोंदणी केली. आरटी-पीसीआर आणि अॅण्टिबॉडीज चाचणी करुन शंभर स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर म्हैसूर, चेन्नई येथील विविध रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीची चाचणी करण्यात येत आहे.