ऑगस्ट अखेरीस तिसरी लाट!  रोज 1 लाख रुग्णसंख्या शक्य; आयसीएमआरचा गंभीर इशारा

आयसीएमआर आणि लंडनच्या इम्पिरियल कॉलेजने विकसित केलेल्या गणितीय मॉडेलवर आधारित हा अंदाज आहे. लसीकरणाची संथ गती आणि निर्बंध शिथिल केल्यामुळे तिसरी लाट येईल. मात्र, दुसऱ्या लाटेएवढी ती तीव्र नसेल, असेही पांडा म्हणाले. विषाणूमध्ये आणखी बदल न झाल्यास पहिल्या लाटेएवढी तीव्रता राहू शकते. मात्र, बदल झाल्यास तिसरी लाट अतिशय धोकादायक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

  दिल्ली : भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा गंभीर इशारा आयसीएमआरने दिला आहे. तिसरी लाट अटळ असल्याचे सांगतानाच प्रा. समीरण पांडा यांनी भारतात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली होती. मे महिन्यात दररोज चार लाख नवे रुग्ण आढळत होते. ही लाट ओसरू लागली आहे असेही सांगितले.

  तीव्र नाही, पण धोकादायक निश्चित

  आयसीएमआर आणि लंडनच्या इम्पिरियल कॉलेजने विकसित केलेल्या गणितीय मॉडेलवर आधारित हा अंदाज आहे. लसीकरणाची संथ गती आणि निर्बंध शिथिल केल्यामुळे तिसरी लाट येईल. मात्र, दुसऱ्या लाटेएवढी ती तीव्र नसेल, असेही पांडा म्हणाले. विषाणूमध्ये आणखी बदल न झाल्यास पहिल्या लाटेएवढी तीव्रता राहू शकते. मात्र, बदल झाल्यास तिसरी लाट अतिशय धोकादायक ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

  लसीकरणास गती आवश्यक

  दरम्यान, मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होईल, असेही पांडा म्हणाले. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे, तसेच मास्कचा वापर हे संसर्गाला प्रतिबंध घालू शकतात. निर्बंध शिथिल करण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर दिशादर्शक ठरू शकेल, असेही ते म्हणाले.

  जगात रोज 9 लाख नवे रुग्ण

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बळावली असून जगातील अनेक देशांमध्ये तिसरी लाट वेशीवर येऊन ठेपली आहे. नेदरलँड, अमेरिका, इंडोनेशिया, थायलंड, ब्रिटन, ब्राझील, स्पेन, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया येथे 50 ते 299टक्के पर्यंत रुग्णसंख्या वाढली आहे. यासोबतच डेल्टा व्हेरिएंट 111 देशांत पसरला असल्याचेही डब्ल्यूएचओने सांगितले आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर महिनाभरातच जगात एकाच दिवशीत नवी रुग्णसंख्या तीन लाखांवरून नऊ लाखांवर पोहोचली आहे.