कोरोनाची तिसरी लाट; डॉक्टर,आरोग्य सेवकांसाठी ९ कोटींचे मास्कसह पीपीई किट्स खरेदी करणार

पालिका रुग्णालये, जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची देखभाल व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य सेवक हे २४ तास कार्यरत असतात. मात्र त्यांचे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना एन - ९५ मास्क व ३ प्लाय मास्कसह पीपीई किट्स यांची आवश्यकता असते. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने टेंडर मागवले होते. त्यानुसार १६ कंत्राटदारांनी या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र त्यापैकी १० कंत्राटदार हे अप्रतिसादात्मक ठरले. तर उर्वरित ६ पैकी लघुत्तम दर असलेले ३ कंत्राटदार यांचे दर प्रतिसादात्मक ठरले. त्यामुळे या ३ कंत्राटदारांना मास्कसह पीपीई किट्सचा पुरवठा करण्याचे ८ कोटी ७० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे.

    मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसरी लाट येण्याची भीती कायम आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच रुग्णालये, जंबो कोविड सेंटरमधील डॉक्टर, आरोग्य सेवक यांच्या सुरक्षिततेसाठी एन -९५ मास्क व ३ – प्लाय मास्कसह पीपीई किट्स
    यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल ९ कोटी रुपये खर्च करणार आहे.

    यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. पालिका रुग्णालये, जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची देखभाल व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य सेवक हे २४ तास कार्यरत असतात. मात्र त्यांचे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना एन – ९५ मास्क व ३ प्लाय मास्कसह पीपीई किट्स यांची आवश्यकता असते. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने टेंडर मागवले होते. त्यानुसार १६ कंत्राटदारांनी या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र त्यापैकी १० कंत्राटदार हे अप्रतिसादात्मक ठरले. तर उर्वरित ६ पैकी लघुत्तम दर असलेले ३ कंत्राटदार यांचे दर प्रतिसादात्मक ठरले. त्यामुळे या ३ कंत्राटदारांना मास्कसह पीपीई किट्सचा पुरवठा करण्याचे ८ कोटी ७० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे.

    यामध्ये, मे. एटलास मल्टी ट्रेड लि. १७५ रुपये प्रति नग दराने ४.९० कोटी रुपयांचे २ लाख ८० हजार नग (७० टक्के), मे. सिम्फनी मल्टीट्रेड लि. कडून १७५ रुपये प्रति नग दराने १ कोटी ५ लाख रुपयांचे ६० हजार नग (१५ टक्के), मे. टोयो फॅशन्स लि. कडून १७५ रुपये प्रति नग दराने ६० हजार नग (१५टक्के) याप्रमाणे तब्बल ७ कोटी रुपयांच्या एन – ९५ मास्कसह ४ लाख पीपीई किट्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.

    त्याचप्रमाणे, मे.एटलास मल्टी ट्रेड लि. १७० रुपये प्रति नग दराने १ कोटी ९० लाख रुपयांचे ७० हजार नग (७०टक्के), मे. सिम्फनी मल्टीट्रेड लि. कडून १७० रुपये प्रति नग दराने २५ लाख ५० लाख रुपयांचे १५ हजार नग (१५टक्के), मे. टोयो फॅशन्स लि. कडून १७० रुपये प्रति नग दराने २५ लाख ५० हजार रुपयांचे १५ हजार नग (१५टक्के) याप्रमाणे १ कोटी ७० लाख रुपयांचे ३ प्लाय मास्कसह १ लाख पीपीई किट्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.