Time of starvation on taxi drivers in Mumbai; 75% of drivers are out of business

भाडे नाकारले म्हणून संतापलेल्या फळविक्रेत्याने डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून टॅक्सीचालकाची हत्या केली आहे. मुंबईतील सर्वात गजबजलेलं ठिकाण असलेल्या दादर परिसरात हा हत्येचा थरार रंगला.

    मुंबई : भाडे नाकारले म्हणून संतापलेल्या फळविक्रेत्याने डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून टॅक्सीचालकाची हत्या केली आहे. मुंबईतील सर्वात गजबजलेलं ठिकाण असलेल्या दादर परिसरात हा हत्येचा थरार रंगला.

    छबीलाल जैस्वार (55) असे मृत टॅक्सीचालकाचे नाव आहे. बसवराज असे हत्या करणाऱ्या फळविक्रेत्याचे नाव आहे. जवळच जायचे असल्याने छबीलाल याने त्याचे भाडे नकाराले.

    यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे संतापलेल्या बसवराज याने जवळच असलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलला आणि छबीलाल याच्या डोक्यात मारला. त्यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने छबीलाल याचा जागीच मृत्यू झाला.