वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची; संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

भाजपा नेते चंद्रकांत पाटील वाघाशी मैत्री करायला तयार आहेत असे आता म्हणू लागले आहेत़ पण वाघ स्वत: ठरवतो कोणाशी मैत्री करायची ते असा खोचक टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला आज येथे लगावला. राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. मोदींनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहोत, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या त्या विधानानंतर राऊत यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत दादा गोड माणूस आहे, त्यांनी गोड खावे, गोड बोलावे़ त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असेही राऊत म्हणाले़.

  मुंबई : भाजपा नेते चंद्रकांत पाटील वाघाशी मैत्री करायला तयार आहेत असे आता म्हणू लागले आहेत़ पण वाघ स्वत: ठरवतो कोणाशी मैत्री करायची ते असा खोचक टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला आज येथे लगावला. राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. मोदींनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहोत, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या त्या विधानानंतर राऊत यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत दादा गोड माणूस आहे, त्यांनी गोड खावे, गोड बोलावे़ त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असेही राऊत म्हणाले़.

  नरेंद्र मोदी हे भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान कोणीही असो त्यांनी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करू नये देशाचा प्रचार करावा. ते देशाचे पंतप्रधान आहेत़ कार्यकर्त्यांचे त्यांच्यावर प्रेम असते. फोटो वापरणे हे त्यांच्यावर असते. लोकांच्या मनात नेता असतो असे संजय राऊत म्हणाले.

  धुसफूस आहेच, तरीही सरकार 5 वर्षे टिकणार; संजय राऊतांची कबुलीवजा स्पष्टोक्ती

  जळगाव, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस नक्कीच आहे, अशी कबुली देत, तरीही हे सरकार 5 वर्षे टीकणार, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगवेगळी असते. यामुळे अंतर्गत धुसफूस असली तरी महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

  प्रत्येक पक्षाला मोठे व्हायचे असते

  प्रत्येक पक्षाला मोठे व्हायचे असते. तसेच प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्री त्यांचा असावा, अशी महत्त्वाकांक्षा असते. महाविकास आघाडीत धुसफूस आहे. मात्र, सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र येऊन पाच वर्ष पूर्ण करण्याची कमिटमेंट केलेली आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टीकेलच असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

  ‘तो’ त्यांचा अंतर्गत प्रश्न

  राऊत यांनी शिवसेनेची विधानसभेतील सदस्यसंख्या 100 च्या पुढे जावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपाकडून बैठका सुरू असल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, भाजपाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हालचाली सुरू केल्या असतील तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अधिक समनव्याने काम करण्यासंबंधी एकत्रित बैठका सुरू केल्या आहेत. भाजपा राज्यातील प्रमुख आणि मोठा विरोधी पक्ष असून त्यांनी अशा बैठका घेणे अपेक्षित आहे.

  हे सुद्धा वाचा