मुंबईच्या सातही तलावांत एकूण ९३.७४ टक्के जलसाठा

जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाल्याने, महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे चार तलाव ओव्हर फ्लो झाले असून अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा हे तीन तलाव भरणे शिल्लक आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण विभागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरांसह सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईच्या सातही तलावांत बऱ्यापैकी पाणी भरले असून मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. आजच्या घडीला या सातही धरणांत ९३.७४ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे.

जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाल्याने, महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे चार तलाव ओव्हर फ्लो झाले असून अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा हे तीन तलाव भरणे शिल्लक आहेत.

इतके टक्के जलसाठा उपलब्ध – 

अप्पर वैतरणा ८३.२० टक्के इतका भरला आहे. तसेच मोडक सागर १०० टक्के, तानसा ९९.४२ टक्के, मध्य वैतरणा ९५.२९ टक्के भातसा ९४.०७ टक्के, विहार १०० टक्के आणि तुळशी १०० टक्के अशा प्रकारे एकूण ९३.७४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.