The tower will now stand in place of Don Arun Gawli's stone quarry; Two 40-storey towers in place of forty

भायखळा येथील बापूराव जगताप मार्गावर सुमारे १२५ वर्षांपासून दगडी चाळ उभी आहे. त्यातील आठ इमारती अरुण गवळी यांच्या मालकीच्या आहेत. उर्वरित दोन इमारती त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. डॉन अरुण गवळी आणि दगडी चाळीचे अतूट नाते आहे. मात्र या चाळी नसून येथे इमारती आहेत. मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहत असताना दगडी चाळीचाही पुनर्विकास होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दगडी चाळीमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार असून यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या आहेत, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वास्तव्याचे ठिकाण असलेल्या भायखळा येथील दगडी चाळीचा पुनर्विकास होणार असून तेथे चाळीस मजल्यांचे दोन टॉवर उभे राहणार आहेत. त्यामुळे दगडी चाळीचा लवकरच कायापालट होणार आहे.

    भायखळा येथील बापूराव जगताप मार्गावर सुमारे १२५ वर्षांपासून दगडी चाळ उभी आहे. त्यातील आठ इमारती अरुण गवळी यांच्या मालकीच्या आहेत. उर्वरित दोन इमारती त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. डॉन अरुण गवळी आणि दगडी चाळीचे अतूट नाते आहे. मात्र या चाळी नसून येथे इमारती आहेत. मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहत असताना दगडी चाळीचाही पुनर्विकास होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दगडी चाळीमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार असून यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या आहेत, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.

    गेल्या कित्येक वर्षांपासून काळाच्या ओघात दगडी चाळीच्या भिंतीही जुन्या, कमकुवत होत चालल्या आहेत. त्यामुळे दगडी चाळीतील १० इमारतींच्या पुनर्विकासाची तयारी सुरू झाली आहे. या सर्व इमारतींचा पुनर्विकास होण्यासाठी म्हाडा मंडळाकडे संमती मागण्यात आली आहे.

    म्हाडाला दगडी चाळीकडून पुनर्विकास संमतीसाठी दोन महिन्यांपूर्वी पत्र प्राप्त झाले आहेत. हा प्रस्ताव म्हाडा मंडळाने स्वीकारला आहे. आता त्याठिकाणी पात्रता निश्चित करणे आदी गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. तेथे ४० मजल्यांचे दोन टॉवर उभे राहणार आहेत. दगडी चाळीतील रहिवाशांना प्रत्येकी ४५० चौरस फुटांचे घर देण्यात येईल. साधारण पुढील चार वर्षांत हे टॉवर उभे राहणार असल्याचे सांगण्यात आले.