सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली हेच सत्य : माजी मुंबई पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंग राजपूत च्या मृत्यू प्रकरणात सत्य दुसरे काहीच नाही आहे. त्याने स्वतः आत्महत्या केली आहे हे स्पष्ट आहे. पुढे ते म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलीस योग्य मार्गाने चौकशी करत आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास दिल्याने मुंबई पोलीसांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला (Sushant Singh Rajput committed suicide) २ महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयने तपास सुरु केल्यापासून या प्रकरणात वेगवेगळ्या घटनांचा उलघडा होत आहे.

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो (Former Commissioner of Police Julio Ribeiro) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंग राजपूत च्या मृत्यू प्रकरणात सत्य दुसरे काहीच नाही आहे. त्याने स्वतः आत्महत्या केली आहे हे स्पष्ट आहे. पुढे ते म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलीस योग्य मार्गाने चौकशी करत आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास दिल्याने मुंबई पोलीसांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच मलाही आश्चर्य वाटले आहे असे ज्युलिओ रिबेरो म्हणाले.
सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस योग्य त्या पातळीवर तपास करत असल्याचे मला वाटते. तसेच सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या भोवती फिरणाऱ्या सिद्धांतांबद्दल बोलताना म्हणाले की, या प्रकरणात तथ्य हे आत्महत्या असल्याचे स्पष्ट आहे.

अभिनेता त्याच्या बेडरुममध्ये एका पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ताच्या बेडरुमलाही आतून कुलूप होते. खोली आतून बंद होती. लॉक तोडणाऱ्याने अनेक प्रयत्न केले परंतु तो लॉक उघडू शकला नाही. अखेर त्याने लॉक तोडण्यास सांगितले. त्यांनी लॉक उघडण्यासाठी काही इतर पद्धतींचा वापर केला. दरवाजा बाहेरुन उघडला गेला. खोली बाहेर गेलेला व्यक्ती काही कसे करु शकतो ? आपण आत्महत्या व्यतिरिक्त कोणताही विचार कसा करता? असा प्रश्न माजी मुंबई पोलीस ज्युलिओ रिबेरो यांनी उपस्थित केला आहे.

सुशांत प्रकरणात तपासादरम्यान मुंबई पोलीस दडपणाखाली होते काय ? या प्रश्नाला उत्तर देताना रिबेरो ज्युलिओ म्हणाले की, या बाबत आपल्याला काही खात्री नाही. मुंबई पोलीस दडपणाखाली काम करत नव्हते याची मला खात्री नाही. आज सर्व पोलीस दलावर राज्य करणारे लोक आणि पक्ष यांचा दबाव आहे.
सुशांत प्रकरणात माध्यमांविषयी बोलताना माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो म्हणाले की, जर प्रत्येक घटना ही माध्यमांच्या द्वारे अशाप्रकारे जात असेल तर ते धोकादायक आहे. जे लोक माध्यमांद्वारे प्रकरणातील पुराव्यांचा दावा करतात त्यांना न्यायालयासमोर बोलावले पाहिजे. त्यानंतरच हा मूर्खपणा थांबेल असे रिबेरो ज्युलिओ म्हणाले.