करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल, देवेंद्र फडणवीस म्हणाले की…

    मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हिडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.