ashish shelar-uddhav thakre

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर काय झाले? उलट शोभा वाढलीच.

मुंबई : भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे नेहमीच शिवसेनेला धारेवर धरतात. आशिष शेलारांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena)  शेलक्या शब्दांत टीका केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत मरिन लाईन्सवर सुरु असलेल्या प्रकल्पावर निशाना साधला आहे. त्यांनी असे म्हटले की, आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले  (environmentally friendly lights ) ते पाप?, आणि तुम्ही केले ते पुण्य, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत. क्विन नेकलेस भविष्यात राहणार नाही याचे काय? असे सवाल करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.


आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर काय झाले? उलट शोभा वाढलीच. पण आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राणार नाही त्याचे काय? असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला आहे.


पुढे आशिष शेलार म्हणाले की, आता पारसी गेट तोडलाच आहे. समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार आणि परिसराची शोभा घालवणार. त्यामुळे तुम्ही करत आहात ते पुण्य आणि आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप? असा प्रश्न उपस्थित केला आहे. झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर तुमच्या ढोंगीपणाचा गाळ दिसला ना अशा आशयाचे ट्विट करत आशिष शेलारांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.