bmc

मुंबई महानगरपालिकेकडेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी नाही. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' आणि त्याच्याशी संलग्न 'तोरणा'या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी नसल्याची वस्तुस्थिती पालिकेने स्पष्ट केली आहे. 

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे  शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही असा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची  २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी पाणीपट्टी थकित असल्याची बबा माहिती अधिकारात उघड झाली. यानंतर अवघ्या काहीच तासात महापालिकेने याचे स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई महानगरपालिकेकडेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी नाही. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ आणि त्याच्याशी संलग्न ‘तोरणा’या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी नसल्याची वस्तुस्थिती पालिकेने स्पष्ट केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी ही केलेल्या माहिती अधिकाऱ्याच्या अर्जानंतर  पाणीपट्टी थकित असल्याची बाब उघडकीस आली. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याचाही समावेश आहे.