महिलेच्या पायाच्या अंगठ्यावरून कारचे चाक गेले; अपघाताच्या सहा वर्षानंतर कोर्ट म्हणते…

रस्ते अपघाताच्या एका प्रकरणावरून मुंबईतील दादर कोर्टोन महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पादचाऱ्याची बेपर्वा वृत्तीच अपघातास कारणीभूत ठरत असेल तर वाहन चालकाला जबाबदार धरता येणार नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. रस्ता पार करतानाच नव्हे तर उपयोग करतेवेळीही सावधगिरी बाळगणे पादचाऱ्याची ड्युटीच आहे. जर पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे अपघात होत असेल तर त्यासाठी वाहन चालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रवीण पी. देशमाने यांनी 56 वर्षाच्या एका महिला व्यवसायिकाची पाच वर्ष जुन्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

    मुंबई : रस्ते अपघाताच्या एका प्रकरणावरून मुंबईतील दादर कोर्टोन महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पादचाऱ्याची बेपर्वा वृत्तीच अपघातास कारणीभूत ठरत असेल तर वाहन चालकाला जबाबदार धरता येणार नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. रस्ता पार करतानाच नव्हे तर उपयोग करतेवेळीही सावधगिरी बाळगणे पादचाऱ्याची ड्युटीच आहे. जर पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे अपघात होत असेल तर त्यासाठी वाहन चालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रवीण पी. देशमाने यांनी 56 वर्षाच्या एका महिला व्यवसायिकाची पाच वर्ष जुन्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

    हे प्रकरण 20 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 9 वाजताची आहे. त्या दिवशी एक महिला पायदळ ऑफिसला जात होती. ज्यावेळी ती पारसी अज्ञारी येथे पोहोचली त्यावेळी मागून येणाऱ्या एका कारने तिला धडक दिली. या अपघातात महिलेच्या पायाच्या अंगठ्यावरून कारचे चाक गेले. ही कार एक महिला व्यावसायिक चालवित होती. अपघात होताच महिलेने कार थांबविलीदेखील होती.

    घटनेच्या दुसऱ्या दिवशी जखमी महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. काही आठवड्यानंतर जकमी महिलेचा जबाबही नोंदविण्यात आला आणि गुन्हाही दाखल करण्यात आला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी कोर्टात आरोपपत्रही सादर केले होते.

    दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पायदळ जाणाऱ्यांसाठी फुटपाथ तयार करण्यात आले आहेत आणि वाहनांसाठी रस्ता असे मत कोर्टाने व्यक्त केले. तथापि जखमी झालेली महिला रस्त्यावरून चालत होती. त्यामुळे वाहन चालकाला दोषी धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.