25 killed in road mishaps: PM condoles, announces help from Center

या कुटुंबातील १२ वर्षांची दिक्षा पारधे ही वाचली असून दिक्षावर सध्या वाशीनाका येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कुटुंबातील श्रुती बारावीत शिकत हाेती. इंजिनिअर बनायचं तिचं स्वप्न हाेतं पण काळाने घाला घातला आणि तीचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं. तिच्या शिक्षणात काेणतीही अडचण येवू नये यासाठी आमचं कुटुंब खूप मेहनत घेत हाेतं. पण एकाच क्षणात हाेत्याच नव्हतं झालं असं त्यांचे नातेवाईक सांगत हाेते.

    मुंबई: पंचशीला पारधे , गौतम पारधे, श्रुती, शुभम आणि दिक्षा पारधे या पाच जणांचा परिवार…. पण, शनिवारी रात्री मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने या कुटुंबाची ताटातूट केली. चेंबूर च्या वाशीनाका येथील भारतनगरमध्ये अनेक वर्षांपासून हे कुटुंब राहत हाेतं. रात्रभर काेसळणाऱ्या जोरदार पावसामुळे वाशीनाका येथील संरक्षक भिंत घरांवर कोसळली आणि त्यात पारधे कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यु झाला.