PUBG च्या नादात अल्पवयीन मुलाने थोडेथोडके नव्हे गमावले ‘इतके’ लाख ; रक्कम ऐकून तुम्ही व्हाल हैराण

मुलगा घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पालकांनी पोलीस ठाणे गाठत संपूर्ण घटनाकथन करत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला.

    मुंबई:अल्पवयीन मुलांमध्ये पबाजी गेम्स असणारे व्यसन काही नवे नाही,मात्र याच पबजी गेम खेळण्याच्या नादात ऑनलाइन व्यवहारातून अल्पवयीन मुलाने थोडेथोडके नव्हे तर तब्बल १० लाख गमावलयाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे व्यथित झालेल्या पालाकांनी मुलाला रागावल्यानंतर मुलाने चक्क घर सोडून निघून जाण्याची धमकी देत घर सोडले. मुंबईमधील जोगेश्वरी येथे हा प्रकार घडला आहे.
    मुलगा घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पालकांनी पोलीस ठाणे गाठत संपूर्ण घटनाकथन करत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. एमआयडीसी पोलिसांनी खबरी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्हे शाखेने मुलाला शोधले. संबंधित मुलगा १६ वर्षाचा असून तो अंधेरी परिसरात सापडला. त्याला समुपदेशनानंतर त्याच्या पालकांकडे परत पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.