
वाशिमच्या गजानन राठोड (Gajanan Rathod) या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. गजानन याने थेट मुख्यमंत्र्याना लग्न जुळवून द्यायला सांगीतले आहे. तरुणाच्या अजब मागणीवर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई : वाशिमच्या गजानन राठोड (Gajanan Rathod) या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. गजानन याने थेट मुख्यमंत्र्याना लग्न जुळवून द्यायला सांगीतले आहे. तरुणाच्या अजब मागणीवर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.
माझे सध्या वय ३५ वर्ष झाले असून आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. त्याचे कारण असे की मी मागील सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे त्यांची एकच मागणी असते की मुलगा जॉबवर पाहिजे, असे गजाननने लिहिले आहे.
आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती असे गजाननने पत्रात लिहीले आहे. या पत्राच्या माध्यमातून तरुणाने सरकारी नोकर भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी केली आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने लिहिलेली पत्र लक्षवेधी ठरली आहेत. कधी चिमुरड्यांनी आपल्या वडिलांना कुटुंबासाठी वेळ देता यावा, म्हणून घातलेली साद डोळ्यात पाणी आणतात. तर काही जणांच्या अजब मागण्याची चर्चेचा विषय ठरल्या.