Akola girl killed her birth mother by hitting her head on a rock; The police were shocked to find out the reason behind the murder

घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण करत त्याची निघृण हत्या केल्याची थरारक घटना घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मुंबई : घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण करत त्याची निघृण हत्या केल्याची थरारक घटना घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    या घटनेत विशाल राम कारंडे या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रमाबाई आंबेडकर कॉलनी परिसरातच राहणाऱ्या काही व्यक्तींशी त्याचा वाद होता. या वादातून शनिवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान या गटातील सहा ते सात जण त्याच्या घरात घुसले आणि त्याला फरफटत बाहेर काढले. त्याला मारहाण करत दगड, पेव्हर ब्लॉक आणि धारधार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

    या घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. पण त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाला. हत्येचा सर्व थरार इथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.