मुंबईत साचलेल्या पाण्यात गटारे उघडी राहिल्याने तरुणी गटारात कोसळली, गटारांची समस्या पुन्हा तीव्रतेने समोर

मुंबईत साचलेल्या पाण्यात गटारे उघडी राहिल्याने दुर्घटना घडल्या आहेत. अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगर येथे आज गटारात एक तरुणी कोसळली. तेव्हाच, तिच्या शेजारी असलेल्या महिलेने तरुणीस लगेचच मदतीचा हात दिल्याने तिला कोणतीही हानी झाली नाही.

    मुंबई – मुंबईत साचलेल्या पाण्यात गटारे उघडी राहिल्याने दुर्घटना घडल्या आहेत. अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगर येथे आज गटारात एक तरुणी कोसळली. तेव्हाच, तिच्या शेजारी असलेल्या महिलेने तरुणीस लगेचच मदतीचा हात दिल्याने तिला कोणतीही हानी झाली नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात टिपला गेला. या सर्व प्रकाराने उघड्या गटारांची समस्या पुन्हा तीव्रतेने समोर आली आहे.

    यापूर्वीही असे काही प्रकार घडल्यानंतरीही पालिकेस जाग आलेली नाही. काही दिवसांपूर्वी पावसाळ्यात भांडुप येथेही अशाच तऱ्हेने एक महिला गटारात पडली होती. मात्र, ती लगेचच त्यातून सुखरुप बाहेर पडण्यात यशस्वी ठरली होती. डॉ. दीपक अमरापूरकर यांचेही मॅनहाेलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला हाेता.