…तर डायरेक्ट FIR दाखल होणार; बेस्टच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून नोकरी हवी असल्यास कडक अटींची बंधने

बेस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात भाडेतत्ववारील अनेक खाजगी कंपनीच्या वातानुकूलित कंत्राटी बसगाड्या चालत आहेत. त्यातील खाजगी वाहतूक मालकांनी बसवाहकांची भरती करताना त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेतला जात आहे. या अर्जामधील अटी व शर्थी मला शपथेवर मान्य आहेत. असे या अर्जात मध्ये म्हटले आहे.बेस्ट उपक्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या या खाजगी बसचे मालक कोणाला बेस्ट मध्ये काम करायचे असेल तर तिकीटाची अमानत रक्कम बीन व्याजी वीस हजार भरायचे, प्रवाशी विना तिकीट सापडला तर तीन हजार चालकानेच भरायचे. आणि एफआरआय दाखल होईल तो वेगळा.

    मुंबई : बेस्ट मध्ये भाडेतत्वावर सुरू असलेल्या खाजगी कंपनीच्या बसवर वाहक म्हणून काम कारायचे असल्यास आधी कंपनीकडे २० हजार रुपये बिनव्याजी सुरक्षा ठेव म्हणून भरावे लागणार आहेत. प्रवाशी विना तिकीट सापडला तर तीन हजार भरायचे. आणि एफआयआर दाखल होईल तो वेगळा, अशा कडक अटी घातल्या आहेत.

    बेस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात भाडेतत्ववारील अनेक खाजगी कंपनीच्या वातानुकूलित कंत्राटी बसगाड्या चालत आहेत. त्यातील खाजगी वाहतूक मालकांनी बसवाहकांची भरती करताना त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेतला जात आहे. या अर्जामधील अटी व शर्थी मला शपथेवर मान्य आहेत. असे या अर्जात मध्ये म्हटले आहे.बेस्ट उपक्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या या खाजगी बसचे मालक कोणाला बेस्ट मध्ये काम करायचे असेल तर तिकीटाची अमानत रक्कम बीन व्याजी वीस हजार भरायचे, प्रवाशी विना तिकीट सापडला तर तीन हजार चालकानेच भरायचे. आणि एफआरआय दाखल होईल तो वेगळा.

    अशा अटी घातल्या आहेत.कामगारांच्या खिशातून पैसे भरून काम करून घेणारी कदाचित बेस्टही जगातील पहिली सार्वजनिक कंपनी असावी. अशी प्रतिक्रिया बेस्ट समितीचे जेष्ठ भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा काळ असून तरुणांना नोकरी मिळणे मुश्किल झाले असताना आता या अटींच्या आधीन राहून वाहकांना काम करावे लागणार आहे.