There are no bird flu cases in India State Health Department Instructions

बर्ड फ्लू माणसाला फारसा हाेत नाही, सध्या हा आजार केवळ पक्ष्यांमध्ये आहे, तर भारतात अाजवर एकही बर्ड फ्लूचा रुग्ण माणसांमध्ये आढळलेला नाही.  हा विषाणू माणसांमध्ये वेगाने पसरताना दिसत नाही. त्यामुळे बर्ड फ्लूला अपण घाबरुन जाण्याची गरज नसली तरीही याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदिप आवटे यांनी केले आहे. सध्या भारतातील अनेक राज्यात बर्ड फ्लू आजाराची लागण विविध पक्ष्यांमध्ये झालेली दिसत आहे. केरळ,मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाणा या प्रदेशात बदके, कांबड्या, कावळे स्थलांरित पक्षी यामध्ये प्रामुख्याने या आजाराची लागण झालेली दिसून येत आहे.

मुंबई: बर्ड फ्लू माणसाला फारसा हाेत नाही, सध्या हा आजार केवळ पक्ष्यांमध्ये आहे, तर भारतात आजवर एकही बर्ड फ्लूचा रुग्ण माणसांमध्ये आढळलेला नाही.  हा विषाणू माणसांमध्ये वेगाने पसरताना दिसत नाही. त्यामुळे बर्ड फ्लूला अपण घाबरुन जाण्याची गरज नसली तरीही याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदिप आवटे यांनी केले आहे. सध्या भारतातील अनेक राज्यात बर्ड फ्लू आजाराची लागण विविध पक्ष्यांमध्ये झालेली दिसत आहे. केरळ,मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाणा या प्रदेशात बदके, कांबड्या, कावळे स्थलांरित पक्षी यामध्ये प्रामुख्याने या आजाराची लागण झालेली दिसून येत आहे.

इन्फ्ल्युएंझा विषाणूचे नैसर्गिक घर म्हणजे पाणपक्षी आहेत. बदक आणि त्यासारखे पाणपक्ष्यांच्या शरीरात हा विषाणू राहतो. या पाणपक्ष्यामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत्वे आतड्याला होतो. बदक आणि इतर पाणपक्षी हे या विषाणूचे मूळ नंतर या मूळ यजमानाकडून हा विषाणू मध्यस्थ यजमानाकडे म्हणजे कोंबड्या किंवा डुक्कर यांच्याकडे या विषाणूचा प्रवास होतो आणि तेथून मग तो माणसाकडे येतो.

१८७८ मध्ये बर्ड फ्लू हा आजार प्रथमतः शेतावर पाळल्या जाणाऱ्या काही पक्षांमध्ये आढळला. १९५९ ते १९९५ मध्ये पोल्ट्री मधील पक्षांमध्ये बर्ड फ्ल्यू आढळण्याच्या पंधरा घटना जगभरात नोंदवण्यात आल्या,तर १९९६ ते २००८ या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या अकरा घटना घडल्या. १९९० नंतर जगभरातील पोल्ट्री मधील पक्ष्यांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले त्यामुळे स्वाभाविकच बर्ड फ्लू उद्रेकाचे प्रमाणही वाढले. १९९६ मध्ये चीनमध्ये प्रथमतः इन्फ्लुएंझा ए एच५ एन १ विषाणू एका पक्ष्याच्या शरीरातून वेगळा करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. १९९७ मध्ये हॉंगकॉंग मध्ये माणसांमध्ये ही बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळले. आतापर्यंत जगभरात बर्ड फ्लूची लागण झालेल्या माणसांची संख्या सातशेच्या आसपास असल्याचे नाेंदविण्यात आले आहे.

बर्ड फ्लू पासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

  • पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
  • शिल्लक उरलेल्या पदार्थांची योग्य विल्हेवाट लावा.
  • एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका.जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा.
  • कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा.परिसर स्वच्छ ठेवा.
  • कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा.
  • पूर्ण शिजवलेले मांसच खा.
  • आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील इंडियन तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागात कळविणे आवश्यक असल्याचे डाॅ. प्रदिप आवटे यांनी सांगितले.